AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 स्थगित, टी 20 वर्ल्ड कपच्या यजमानपदावरही टांगती तलवार, BCCI ला दुहेरी झटका?

2020 मध्ये टी 20 वर्ल्ड कपऐवजी (ICC T20 World Cup 2021) आयपीएलच्या 13 व्या (IPL) मोसमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या वर्षी वर्ल्ड कपचं आयोजन भारतात होणार आहे.

IPL 2021 स्थगित, टी 20 वर्ल्ड कपच्या यजमानपदावरही टांगती तलवार, BCCI ला दुहेरी झटका?
2020 मध्ये टी 20 वर्ल्ड कपऐवजी (ICC T20 World Cup 2021) आयपीएलच्या 13 व्या (IPL) मोसमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या वर्षी वर्ल्ड कपचं आयोजन भारतात होणार आहे.
| Updated on: May 04, 2021 | 8:33 PM
Share

मुंबई | खेळाडूंना झालेली बाधा आणि आणि वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर (BCCI) बीसीसाआयने आयपीएलचा 14 वा (IPL 2021) मोसम स्थगित केला. 14 व्या मोसमातील 29 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित सामने केव्हा होणार याबाबतचा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. दरम्यान या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासह बीसीसीआयवर वर्ल्ड टी 20 कपच्या (ICC T20 World Cup 2021) यजमानपदावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये या स्पर्धेंच आयोजन करण्यात आले आहे. (Question mark for BCCI over hosting of T20 World Cup after ipl 2021 suspended)

खेळाडूंना कोरोनाची लागण

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची 9 एप्रिलपासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते 2 मे पर्यंत बिनादिक्कत 29 सामने खेळवण्यात आले. या पर्वाच्या सुरुवातीआधी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. मात्र पर्वाला सुरुवात झाल्यापासून कोणताही खेळाडू पॉझिटिव्ह आढळला नाही. पण 3 आणि 4 मे या 2 दिवसांमध्ये 6 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

वर्ल्ड कपचं यजमानपद धोक्यात?

त्यामुळे बीसीसीआयसमोर आता उर्वरित सामन्यांचं आयोजन करण्याचं आव्हान आहे. पुढील काही महिन्यात विविध संघांचा दौरा प्रस्तावित आहे. त्यात भारताला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. भारताला म्हणजेच बीसीसीआयकडे या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात होणारी ही स्पर्धा 2022 पर्यंत स्थगित करण्यात आली. या बदल्यात IPL 2020चं आयोजन करण्यात आलं. मात्र या वर्षी बीसीसीआयला वर्ल्ड कप स्पर्धा रद्द करणं महागात पडू शकतं.

दरम्यान वर्ल्ड कपबाबत सुरुवातीपासून विविध चर्चा सुरु होत्या. त्यात भारतातील वाढत्या रुग्णसंख्या पाहून वर्ल्ड कपसाठी प्लॅन बी तयार केल्याचे संकेत आयसीसीने काही आठवड्यांपूर्वी दिले होते. मात्र अजूनही आयसीसीने या प्लॅन बी बाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण बीसीसीआय स्वत: बॅक अप प्लॅनवर काम करणार आहे.

BCCI चा प्लॅन बी काय?

या स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये करण्यात येणार आहे, असा अंदाज गेल्या काही काळापासून लावण्यात येत होता. प्लॅन बी म्हणून वर्ल्ड कपचं आयोजन यूएईमध्ये केलं जाणार, याबाबत वर्ल्ड कप आयोजनाची जबाबदारी असलेल्या BCCI च्या अधिकाऱ्यानी म्हटलं होतं. दरम्यान आयोजन यूएईमध्ये केलं गेलं तरी त्याची सर्व जबाबदारी बीसीसीआयकडे असेल, याबाबत बोर्ड आश्वस्त आहे.

तसेच या कोरोना स्थितीत वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडे यूएईपेक्षा दुसरा उत्तम पर्याय नाही. तसेच आयसीसीही आपल्या बॅक अप प्लॅनवर फेरविचार करु शकते. कारण आयसीसी या स्पर्धेची मुख्य आयोजक आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयसीसीसोबत चर्चा करुन सुवर्णमध्ये काढावा लागेल. मात्र आता वर्ल्ड कपचं आयोजन भारतात होईल, ही शक्यता फार कमी झाली आहे.

संबंधित बातम्या

IPL 2021 | आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित, उर्वरित सामन्यांचं काय? जाणून घ्या सविस्तर

PHOTO | कोरोनाचा क्रीडाक्षेत्राला दणका, IPLसह ‘या’ मोठ्या स्पर्धा स्थगित

(Question mark for BCCI over hosting of T20 World Cup after ipl suspended)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.