‘नाद करा पण माझा कुठं…’ म्हणण्याची आर. अश्विनला संधी, WTC फायनलमध्ये विक्रम करणार?

आर अश्विनने 13 सामन्यांत 67 विकेट्स घेतल्या आहेत तर पॅट कमिन्सने 14 मॅचमध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच अश्विनला अंतिम सामन्यात केवळ 4 विकेट्स घ्यायच्या आहेत. (R Ashwin pat Cummins became Highest wicket taker in WTC)

'नाद करा पण माझा कुठं...' म्हणण्याची आर. अश्विनला संधी, WTC फायनलमध्ये विक्रम करणार?
आऱ अश्विन

मुंबई : भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर (India tour of England) जातोय. दौऱ्यावर भारताला कसोटी क्रिकेटचा वर्ल्डकप समजला जाणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2021) अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यात खेळण्यासाठी भारताने मागील दोन-तीन वर्ष खूप मेहनत केली आहे. त्यासाठी खेळाडूंनी जीवाचं रान केलं आहे. आता अंतिम सामन्यात भारतीय फिरकीपटू आर अश्विनला (R Ashwin) खूप मोठी संधी चालून आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्याची नामी संधी अश्विनकडे आहे. (R Ashwin Pat Cummins became Highest wicket taker in WTC)

आर अश्विनकडे मोठा विक्रम करण्याची संधी

आर अश्विनने 13 सामन्यांत 20. 88 च्या सरासरीने तब्बल 67 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जर त्याने 4 विकेट्स मिळवल्या तर 71 विकेट्स घेऊन तो टूर्नामेंटमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. वर्ल्ड टेस्ट टॅम्पियनशीपमध्ये सध्या 14 मॅचमध्ये 70 विकेट्स घेऊन पॅट कमिन्स विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आर अश्विनच्या बोलिंगवर सगळ्या जगाचं लक्ष असेल.

पॅट कमिन्स अव्वल स्थानी

आर अश्विनने 13 सामन्यांत 67 विकेट्स घेतल्या आहेत तर पॅट कमिन्सने 14 मॅचमध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच अश्विनला अंतिम सामन्यात केवळ 4 विकेट्स घ्यायच्या आहेत. जर अश्विनने अंतिम सामन्यात 4 विकेट्स घेतल्या तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून त्याची नोंद होऊ शकते.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला जर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी पोहोचायचं असेल तर भारतीय संघाच्या दोन्ही डावांत सगळ्या विकेट्स त्याला घ्याव्या लागतील. सध्या 10 मॅचमध्ये त्याने 51 विकेट्स घेतल्यात. अव्वस स्थानी यायला त्याला आणखई 20 विकेट्सची गरज आहे.

WTC फायनलसाठी भारतीय संघाचं मिशन ’72 तास’ प्लॅन

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल.

(R Ashwin Pat Cummins became Highest wicket taker in WTC)

हे ही वाचा :

Couple Goals : भारतीय क्रिकेटपटूचं पत्नीसोबत जबरदस्त वर्कआऊट, VIDEO पाहून चक्रावून जाल

Video : मोहम्मद कैफ पत्नीसोबत घरीच खेळतोय क्रिकेट, पाहा व्हिडिओ

WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा ‘सिक्रेट प्लॅन’, 72 तासांच विशेष मिशन