AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : वैभव राजस्थान रॉयल्समध्ये नाराज, कोचचा खुलासा, त्याला टीममध्ये एक गोष्ट पटत नाहीय, ती म्हणजे..

Vaibhav Sooryavanshi : यंदाच्या आयपीएलमध्ये एका नावाची चर्चा आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. हा 15 वर्षाचा मुलगा भल्या भल्या गोलंदाजांची बॉलिंग फोडून काढतोय. पण त्याच्याबद्दल आता राजस्थानच्याच कोचने धक्कादायक खुलासा केला आहे.

Vaibhav Sooryavanshi : वैभव राजस्थान रॉयल्समध्ये नाराज, कोचचा खुलासा, त्याला टीममध्ये एक गोष्ट पटत नाहीय, ती म्हणजे..
vaibhav sooryavanshi
| Updated on: Apr 14, 2026 | 10:24 PM
Share

इंड‍ियन प्रीम‍ियर लीग (IPL) 2026 च्या सीजनमध्ये दमदार सुरुवात करणारा वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या रणनितीवर पूर्णपणे खुश नसल्याची माहिती आहे. या सीजनमध्ये त्याने आतापर्यंत 200 रन्स केल्या आहेत. नुकतच त्याचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करण्यात आला. त्यावर वैभव नाराज असल्याची माहिती आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध वैभव सर्यवंशी गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. हैदराबादकडून डेब्यु करणाऱ्या वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगेन त्याला आऊट केलं. शॉर्ट बॉलवर त्याने वैभव सूर्यवंशीला चकवलं. चेंडूने बॅटच्या वरच्या बाजूची कड घेतली आणि तो विकेटकिपर सलील अरोडाच्या ग्लोव्हजमध्ये विसावला.

मॅच दरम्यान राजस्थान रॉयल्सचा फिल्डिंग कोच ट्रेवर पेनीने मोठा खुलासा केला. सतत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर होत असल्याने वैभव नाराज असल्याचं पेनीने सांगितलं. त्यामुळे त्याला फिल्डिंग करण्याची संधी मिळत नाहीय. वैभवला फिल्डिंग आवडते. असं नाहीय की तो खराब फिल्डर आहे असं पेनी म्हणाला.

आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला

डोनोवन फरेरा फिट होऊन टीममध्ये परतल्याने वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हन बाहेर बसावं लागलं. फरेराला SA20 लीग दरम्यान कॉलरबोन इंजरी झाली होती. पण तो आता फिट होऊन परतलाय. चांगल्या फिल्डिंगमुळे त्याने टीममध्ये जागा बनवलीय. फरेराने SRH विरुद्ध सामन्यात आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. त्यावेळी 9 रन्सवर टीमचे पाच विकेट गेले होते. फरेरा 44 चेंडूत 69 धावांची शानदार इनिंग खेळला. यात 7 चौकार आणि 3 सिक्स आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी मोठी भागीदारी

रवींद्र जाडेजासोबत त्याने सहाव्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी मोठी भागीदारी आहे. खास बाब म्हणजे फरेराचं आयपीएलमधील हे पहिलं अर्धशतक होतं. याआधी फरेराला आयपीएलमध्ये जास्त संधी मिळालेली नाही. 2024 साली राजस्थानसाठी तो दोन सामने खेळला होता. पण फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. दिल्ली कॅपिटल्सकडून सुद्धा तो फक्त एक सामना खेळला.

ईडन गार्डन्सवर ही मॅच

राजस्थान रॉयल्सला या सीजनमधील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. आता टीमचा पुढचा सामना 19 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे. ईडन गार्डन्सवर ही मॅच होणार आहे. वैभव सूर्यवंशीचा पुन्हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करणार की, प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणार? हे लवकरच समजेल.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.