रमेश पोवारचा प्रशिक्षक पदासाठी पुन्हा अर्ज

नवी दिल्ली : महिला टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप कर्णधार स्मृती मंधानाच्या समर्थनानंतर रमेश पोवारने पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दिला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून पोवार यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला पूर्ण झाला. पोवारने पीटीआयला याबाबत माहिती दिली. पोवार ने सांगितले की, ‘हो, मी अर्ज दिला, कारण हरमनप्रीत आणि …

रमेश पोवारचा प्रशिक्षक पदासाठी पुन्हा अर्ज

नवी दिल्ली : महिला टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप कर्णधार स्मृती मंधानाच्या समर्थनानंतर रमेश पोवारने पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दिला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून पोवार यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला पूर्ण झाला. पोवारने पीटीआयला याबाबत माहिती दिली.

पोवार ने सांगितले की,

‘हो, मी अर्ज दिला, कारण हरमनप्रीत आणि स्मृतीने मला समर्थन दिले. मी त्यांना निराश करु शकत नव्हतो.’

पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाला मागील महिन्यात टी-20 विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पोवार आणि हरमनप्रीत यांच्यासोबतच संघ व्यवस्थापनाने सिनिअर खेळाडू मिताली राजला या सामन्यात बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन मिताली आणि पोवारमध्ये मोठा वाद झाला होता.

“बीसीसीआयमधील काही शक्तिशाली माणसं माझी कारकीर्द संपवण्याचे प्रयत्न करत आहेत”, असा आरोप मितालीने या पत्रातून प्रशिक्षक पोवार आणि संघ व्यवस्थापक सदस्या एडुलजीवर केला होता.

यावर पोवारनेही मितालीवर आरोप लावला की, तिला सलामीवीर म्हणून न खेळवल्यास ती टी-20 विश्वचषक संपण्याआधीच निवृत्ती घेण्याची धमकी दिली तसेच तिने संघाला विभाजीत करण्याचाही प्रयत्न केला.

या सर्व वादानंतर बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला. यासाठी 14 डिसेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.

कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शुभांगी कुलकर्णी यांच्या समितीकडे प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी सोपविली गेली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *