Icc Test Ranking | Rishabh Pantची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय विकेटकीपर

टीम इंडियाचा (indian wicket keepar) विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये (Icc Test Ranking) 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

Icc Test Ranking | Rishabh Pantची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय विकेटकीपर
टीम इंडियाचा (indian wicket keepar) विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये (Icc Test Ranking) 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

दुबई | आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टेस्ट रॅंकिंग जाहीर (Icc Test Ranking) केली आहे. फलंदाजाच्या पहिल्या 10 जणांच्या यादीत टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये कर्णधार (Virat Kohli) विराट कोहली, रिषभ पंत (Rishabh Pant) रोहित शर्माचा (Rohit Sharma) समावेश आहे. या दोघांना एक एक स्थानाचा फायदा झाला आहे. तर पंत कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच 6 व्या क्रमांकावर पोहचला आहे. याआधी पंत 7 व्या क्रमांकावर विराजमान होता. पंत अशी कामिगरी करणारा पहिलाच भारतीय विकेटकीपर ठरला आहे. (rishabh pant become 1st indian wicket keepar who reach 6th position in icc test ranking)

बाबर आझमची घसरण

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोठा झटका लागला आहे. बाबरची 6 व्या क्रमांकावरुन थेट नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याचा फायदा रिषभ, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या हेनरी निकोलसला झाला आहे. हे तिनही फलंदाज 747 पॉइंट्स टेबलमध्ये संयुक्तरित्या 6 व्या क्रमांकावर होते. रिषभ पंतने इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील 4 सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 280 धावा केल्या होत्या.

केन विलियम्सन अव्वलस्थानी

तसेच न्यूझीलंडचा केन विलियम्सन आपलं पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ, तिसऱ्या क्रमांकावर मार्नस लाबुशेन विराजमान आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुट चौथ्या क्रमांकावर आहे.

पुजारा-रहाणेची घसरण

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे टीम इंडियाच्या मधल्या फळीतील महत्वाचे फलंदाज आहेत. मात्र या दोघांना 1 स्थानाचं नुकसान झाला आहे. पुजारा 14 व्या तर रहाणेची 15 व्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच श्रीलंका क्रिकेट टीमचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने मोठी झेप घेतली आहे. त्याला 4 स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने 15 व्या क्रमांकावरुन थेट 11 व्या स्थानी झेप घेतली आहे. त्याने मागील 4 कसोटींध्ये 519 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने बांग्लादेश विरुद्ध द्विशतक झळकावलं होतं.

फिरकीपटू अश्विन दुसऱ्या स्थानी कायम

गोलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. अश्विन 857 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 908 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | नवे आहेत पण छावे आहेत ! आयपीएलच्या 14 व्या मोसमात युवा खेळाडूंसमोर दिग्गजांचं लोटांगण

IPL 2021 | सनरायजर्स हैदराबादच्या हॉटेलमध्ये 3 संशयित, बीसीसीआयने केली ‘ही’ कारवाई

(rishabh pant become 1st indian wicket keepar who reach 6th position in icc test ranking)

Published On - 12:01 am, Thu, 6 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI