India Vs England : आम्ही रिषभ पंतचं वजन कमी केलं आणि…, रवी शास्त्री यांचा मोठा गौप्यस्फोट

रिषभच्या या सगळ्या करिश्म्यापाठीमागे त्याने वजन कमी केल्याचा मोठा गौप्यस्फोट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला. | Rishabh Pant lost weight Ravi Shastri reveal Secret

India Vs England : आम्ही रिषभ पंतचं वजन कमी केलं आणि..., रवी शास्त्री यांचा मोठा गौप्यस्फोट
Rishabh Pant And Ravi Shastri
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 8:37 PM

अहमदाबाद : भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंड संघाला (India Vs England) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने धूळ चारली. या मालिकेत अनुभवी खेळाडू जलवा दाखवू शकले नाहीत परंतु युवा खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने मालिकेवर छाप सोडली. यामध्ये भारताचा विकेट कीपर फलंदाज रिषभ पंतचं (Rishabh Pant) नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. रिषभने आपल्या बॅटिंगने स्पर्धेत आपली छाप सोडली तर कीपिंगनेही क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. रिषभच्या या सगळ्या करिश्म्यापाठीमागे त्याने वजन कमी केल्याचा मोठा गौप्यस्फोट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केला. (Rishabh Pant lost weight Ravi Shastri reveal Secret)

रिषभचं आक्रमण गुरुजी शास्त्रींना भावलं

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या मॅचमध्ये रिषभने ठोकलेलं आक्रमक शतक हे प्रत्युत्तरादाखल ठोकलेलं सर्वोत्तम शतक होतं, असं म्हणत खुद्द रवी शास्त्री यांनी रिषभच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. रिषभची खेळी ही आक्रमकतेने आणि जिद्दीने परिपूर्ण असलेली खेळी होती. त्याच्या खेळीने मॅचचा अंदाज पलटला, अशी स्तुतीसुमने रवी शास्त्री यांनी रिषभवर उधळली.

रिषभने 118 चेंडूंचा सामना करताना 101 रन्स ठोकले. याच खेळीने इंग्लंडवर दबाव आला आणि भारताने ही मॅच एक डाव आणि 25 धावांनी जिंकत मालकाही आपल्या नावे केली, असं रवी शास्त्री म्हणाले.

रिषभच्या मेहनतीला फळ मिळालं

खूप कष्टानंतर रिषभच्या बॅटने आपले रंग दाखवायला सुरु केले आहे. पाठीमागच्या तीन ते चार महिन्यांपासून रिषभ खूप मेहनत करतोय. त्याच्या बॅटिंगवर तसंच विकेट कीपिंगवर तो फोकस करतो. त्यासाठी तो मैदानात अविरत घाम गाळतोय, असं शास्त्री म्हणाले.

रिषभने वजन घटवलं

कुठलंही यश सहजासहजी मिळत नाही. परिश्रमानंतर यश मिळतंच. त्याच्या बॅटिंगमध्ये आणि विकेट कीपिंगमध्ये चांगली कामगिरी व्हावी म्हणून रिषभने विशेष प्रयत्न केले. यामध्ये त्याने वजन घटवलं जे फायदेशीर ठरलं, असा मोठा खुलासा रवी शास्त्री यांनी केला.

…मग रिषभ हट्टाला पेटला

आम्ही त्याच्यासाठी अतिशय सक्त होतो. काहीही सहजपणे मिळत नाही, हे त्याला सांगण्यात आलं. तुला अधिकाधिक खेळाचा आदर करावा लागेल हे सांगताना तुला वजन कमी करावे लागेल आणि यष्टीरक्षकांमध्ये कठोर परिश्रम करावे लागतील, अशा सूचना त्याला देण्यात आल्या. यानंतर रिषभ हट्टाला पेटला आणि जे काही झालं आता ते तुमच्या समोर आहे, अशी रिषभची यशोगाथा रवी शास्त्री यांनी सांगितली.

रिषभ पंतची दमदार कामगिरी

टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन रिषभ पंतने बॅटिंग आणि कीपिंगमध्येही जलवा दाखवला. या सिरीजमध्ये 54 च्या सरासरीने त्याने 270 रन्स काढले तर स्टंपच्या मागेही त्याने आपला करिश्मा दाखवला. 13 फलंदाजांना त्याने माघारी धाडलं. पीचने करामत दाखवायला सुरुवात केल्यानंतर त्याने 8 झेल पकडले तर 5 स्टम्पिंग केल्या.

(Rishabh Pant lost weight Ravi Shastri reveal Secret)

हे ही वाचा :

Ind Vs ENG : कुणी बॅटिंगने पाहुण्यांचं तोंड बंद केलं तर कुणी फिरकीवर नाचवलं, भारताच्या विजयाचे 5 चेहरे!

R Ashwin | फिरकीने कमाल, बॅटिंगने धमाल, अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.