AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत श्रीलंका कसोटी सामना सुरू असताना अचानक अंपायर बदलला, 95 व्या षटकापूर्वी काय झालं?

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. या सामन्यात अचानक पंच बदलण्याची वेळ आली. रॉड टकर यांना सामना सोडून जावं लागलं. 95 षटकापूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मैदान सोडलं.

भारत श्रीलंका कसोटी सामना सुरू असताना अचानक अंपायर बदलला, 95 व्या षटकापूर्वी काय झालं?
भारत श्रीलंका कसोटी सामना सुरू असताना अचानक अंपायर बदलला, 95 व्या षटकापूर्वी काय झालं?
| Updated on: Aug 16, 2026 | 7:38 PM
Share

IND vs SL Galle Test Umpire Rod Tucker: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामन्याचा दुसरा दिवसाचा खेळ लंच ब्रेकनंतर सुरू झाला. कारण पहिल्या सत्रात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. असं असताना या सामन्यात एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून ऑस्ट्रेलिया अनुभवी आणि आयसीसी एलीट पॅनेलचे सदस्य रॉड टकर होते. पण त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांनी सामना सोडण्याच निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात सदर प्रकार घडला. भारतीय डावाचं 95वं षटक सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेतला गेला.  लगेचच टी ब्रेक झाला  त्यांच्या जागी श्रीलंकेचे राखीव पंच रवींद्र विमलसिरी भूमिकेत आले. त्याच्यासोबत दुसरे पंच म्हणून बांगलादेशचे पंच शरफुद्दौला होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामना सुरू असताना पंच बदलण्याची स्थिती खूपच दुर्मिळ आहे. त्यामुळे अचानक पंच बदलल्याने चर्चा रंगली आहे. मैदानी पंच रॉड टकर यांना नेमकं काय झालं? हे अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असावी अशी आशा आहे. रॉड टकर हे 61 वर्षांचे असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले पंच आहेत. त्यांच्याकडे पंचगिरीचा दांडगा अनुभव आहे. पंचगिरी करण्यापूर्वी रॉड टकर एक क्रिकेटपटू होते. गॉल कसोटी सामन्यात, टीव्ही पंच म्हणून पाकिस्तानचे अहसन रजा आणि सामनाधिकारी म्हणून झिम्बाब्वेचे अँडी पायक्राफ्ट भूमिका बजावत आहेत.

रॉड टकर यांचा पंच होण्यापर्यंतचा प्रवास

रॉड टकर यांचं क्रिकेटसोबतचं नातं खूप जुनं आहे. टकर ऑस्ट्रेलियासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. 1985 ते 1988 या कालावधीत न्यू साउथ वेल्ससाठी खेळले आहेत. त्यानंतर तस्मानियात गेले आणि 1988 ते 1999 पर्यंत खेळले. 1991 ते 1996 पर्यंत तस्मानियाचे उपकर्णधार म्हणून भूमिका बजावली. त्यानंतर 1999/200 या कालावधीत त्याने कॅनबरा कॉमेट्सचे कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून दुहेरी भूमिका बजावली. त्यानंतर खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली. त्यानंतर पंचच्या भूमिकेत आले आणि 2008 मध्ये आयसीसी आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 2010 मध्ये आयसीसी एलीट पॅनेलमध्ये सहभागी झाले. आतापर्यंत त्यांनी 101 कसोटी सामन्यात पंच म्हणून भूमिका बजावली आहे. 110 वनडे आणि 66 टी20 सामन्यात ऑन फिल्ड भूमिकेत राहिलेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा