AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी उभारणार!, पालकमंत्र्यांशी चर्चा

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहे.

रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी उभारणार!, पालकमंत्र्यांशी चर्चा
| Updated on: Feb 01, 2021 | 10:27 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहे. यासंदर्भात धवल कुलकर्णी याने आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विचारविनिमय केला. (Rohit Sharma and Dhawal Kulkarni will set up a cricket academy in Nanded)

धवल कुलकर्णी आणि ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी सोमवारी सायंकाळी मुंबई येथे अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत कुलकर्णी आणि दहिवल यांनी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरु करण्याबाबत अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

धवल कुलकर्णी याने यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली आणि नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. धवल कुलकर्णी आणि दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून अशोक चव्हाण यांना टीम इंडियाची एक जर्सी भेट दिली. या अकादमीच्या उभारणीबाबत चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.

धवल कुलकर्णी याने आतापर्यंत 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या 12 सामन्यांमध्ये त्याने 19 बळी मिळवले आहेत. तर दोन टी-20 सामन्यांमध्ये धवलला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यात त्याने 3 बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये धवल 91 सामने खेळला आहे. या 91 सामन्यांमध्ये त्याने 86 विकेट्स मिळवल्या आहेत.

हेही वाचा

विराटच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील नेतृत्वाबाबत कधीच बोललो नाही : गौतम गंभीर

निकोलस पूरनची तडाखेबंद फलंदाजी; अवघ्या 26 चेंडूंमध्ये कुटल्या 89 धावा

Union Budget 2021 | बजेटदरम्यान टीम इंडियाच्या विजयाचा उल्लेख, निर्मला सीातारमण म्हणाल्या….

(Rohit Sharma and Dhawal Kulkarni will set up a cricket academy in Nanded)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.