माजी सिलेक्टर किरण मोरे यांचा मोठा दावा, विराट कोहलीऐवजी ‘हा’ खेळाडू भारताचा कर्णधार होणार!

माजी सिलेक्टर किरण मोरे यांचा मोठा दावा, विराट कोहलीऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार होणार!
Virat Kohli

सध्या विराट कोहलीकडे भारताचं नेतृत्व आहे. पण लवकरच भारतीय संघाची जबाबदारी विस्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात येईल, असा मोठा दावा माजी सिलेक्टर किरण मोरे (Kiran More) यांनी केला आहे. (Rohit Sharma Virat Kohli Kiran More)

Akshay Adhav

|

May 27, 2021 | 12:57 PM

मुंबई : एम एस धोनीने जसं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडलं तेव्हापासून विराट कोहली (Virat Kohi) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यामध्ये कर्णधारपदासाठी चुरस असलेली पाहायला मिळतीय. सध्या विराट कोहलीकडे भारताचं नेतृत्व आहे. पण लवकरच भारतीय संघाची जबाबदारी विस्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात येईल, असा मोठा दावा माजी सिलेक्टर किरण मोरे (Kiran More) यांनी केला आहे. लवकरच रोहित शर्माकडे कही फ़रमॅटमधील कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असा दावा किरण मोरे यांनी केला आहे. (Rohit Sharma will be the captain of India instead of Virat Kohli Former selector Kiran More big claim)

किरण मोरे काय म्हणाले…?

एका न्यूज चॅनेलशी बोलताना किरण मोरे म्हणाले, “रोहित शर्माला लवकरच कर्णधारपदाची संधी मिळणार आहे. कोहली एक दिग्गज कर्णधार आहे, परंतु तो किती दिवस वनडे आणि टी -20 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. इंग्लंड दौऱ्यावरुन भारतीय संघ परतल्यानंतर याविषयीचा निर्णय घ्यावा लागेल किंबहुना यावर चर्चा होईल.”

किरण मोरे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सांभाळणं हे काही सोपं काम नाही. भारतीय संघ वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांवर लक्ष केंद्रित करु शकतो. किंबहुना येणाऱ्या काळात तशी निवड होऊ शकते. रोहित शर्मा जर चांगली कामगिरी करत असेल तर त्याला संधी मिळायला हवी.”

कॅप्टन्सीमध्ये रोहित विराटच्या एक पाऊल पुढे…!

रोहित शर्माने आशिया चषक आणि निदाहास करंडक सारख्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवलं आहे. दुसरीकडे भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात कोणतीही मोठी स्पर्धा अजूनपर्यंत जिंकलेली नाही. आयसीसी स्पर्धा असो किंवा आयपीएल स्पर्धा, विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम जिंकण्यात अपयशी ठरली आहे.

मुंबई 5 वेळा चॅम्पियन, बंगळुरु एकदाही नाही

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने 5 वेळा आयपीएलचं जेतेपद मिळवलं आहे. मुंबईच्या संघाने 2013, 2015, 2017, 2019, 2020 या पाच वर्षी प्रतिस्पर्धी संघांना धुळ चारत रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलचं जेतेपद पटकावलं. तर दुसरीकडे मात्र रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा संघ आतापर्यंत तीन वेळा (2009, 2011, 2016) आयपीएल फायनलपर्यंत पोहोचला आहे. परंतु तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विराटला आणखी एकदाही आयपीएलचं जेतेपद पटकावता आलं नाही.

(Rohit Sharma will be the captain of India instead of Virat Kohli Former selector Kiran More big claim)

हे ही वाचा :

शिखर-पृथ्वी सलामीवीर, पांड्या ब्रदर्स मधल्या फळीत, श्रीलंका दौऱ्यासाठी दिग्गजाची भारतीय टीम, पाहा कुणा-कुणाला संधी

WTC Final : ‘रोहितने केलेल्या चूका तू नको करु’, कपिल देव यांचा ऋषभ पंतला सल्ला

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख ठरली, पण BCCI पुढे ही सर्वांत मोठी अडचण!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें