AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून घरी परतला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धची मॅच जिंकली असून तो रुग्णालयातून घरी परतला आहे. Sachin Tendulkar

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून घरी परतला
सचिन तेंडुलकर
| Updated on: Apr 08, 2021 | 6:48 PM
Share

मुंबई :  माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण (Sachin Tendulkar Corona) झाली होती. मात्र, त्यानंतर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. सचिनने घरामध्ये विलगीकरणात राहणार असल्याची माहिती दिली आहे. (Sachin Tendulkar got discharged from hospital after successfully recover from corona informed by tweet)

सचिन तेंडुलकरचं ट्विट

सचिन ट्विटमध्ये काय म्हणाला?

सचिन तेंडुलकरनं ट्विट करत थोड्यावेळापूर्वी रुग्णालयातून घरी परतलो. सध्या विलगीकरणात आराम करत आहे. सर्व चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी त्यांचे आभार मानतो. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो, असं सचिन तेंडुलकर यांनं म्हटलं आहे.

सचिन तेंडुलकर 2 एप्रिलला रुग्णालयात दाखल

कोरोनाची लागण झाल्यावर तो घरातच क्वारंटाईन होता. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र आज ट्विट करत त्याने आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचं सांगितलं आहे. सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या तसंच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केल्या होत्या.

सचिन तेंडुलकरला 27 मार्चला कोरोनाची लागण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला 27 मार्चला कोरोनाची लागण झाली. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग

सचिन तेंडुलकर नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला. या स्पर्धेत त्याने धुवांधार बॅटिंग केली. सेहवागच्या साथीने सलामीला मैदानात येत त्याने इंडिया लिजेंड्सला स्पर्धेतील मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा फटकावल्या. भारतीय संघाने या स्पर्धेत विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 14 धावांनी हरवून, ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

संबंधित बातम्या:

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Sachin Tendulkar Corona : सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

(Sachin Tendulkar got discharged from hospital after successfully recover from corona informed by tweet)

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....