AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : सासरे असावे तर असे.. सचिनकडून सूनबाई सानियाची प्रेमाने विचारपूस; Video

Sachin Tendulkar Saaniya Chandhok : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करणारा, क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला सचिन तेंडुलकर... तो एक परफेक्ट फॅमिलीमॅनही आहे. प्रेमळ सासऱ्याचं त्याचं रूप समोर आलं असून सुनेची लेकीप्रमाणे काळजी घेताना पाहून नेटकरीही भावूक झाले. सचिनचा एक व्हिडीओ समोर आला असून त्याचं प्रचंड कौतुक होत आहे.

Sachin Tendulkar : सासरे असावे तर असे.. सचिनकडून सूनबाई सानियाची प्रेमाने विचारपूस; Video
सचिन तेंडुलकरचा साधेपणा पुन्हा चर्चेत;Image Credit source: social media
| Updated on: Jul 30, 2026 | 10:16 AM
Share

प्रत्येक चांगला खेळाडू, हा तेवढीच चांगली व्यक्ती, माणूस असेलच असं नाही. पण सचिनबाबत असं म्हणता येणार नाही. मैदानावर शतकांचा पाऊस पाडणारा सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) हा फक्त क्रिकेटमधला सुपरस्टार नाही, तर खऱ्या आयुष्यातही तो तितकाच साधा, नम्र आणि कुटुंबवत्सल आहे. याचीच प्रचिती देणारा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये सचिन हा त्याची पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) आणि सून सानिया चंडोकसोबत (Sania Chandok) स्पॉट झाला. एका रेस्टॉरंटमध्ये ते तिघे दिसले, त्यांचा व्हिडीओ पाहून अनेक कमेंट्स आल्या असून चाहत्यांनी सचिनचं भरभरून कौतुक केलंय.

लेकीप्रमाणे घेतली सुनेची काळजी

या व्हिडीओमध्ये सचिन, अंजली आणि सानिया एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसले. वातावरण अगदी कौटुंबिक आणि आनंदी होतं. याचदरम्यान सचिनने, प्रेमाने सानियाला चहा किंवा कॉफी घेणार का, अशी विचारपूस केली. तिने बहुधा नकार दिल्यानंतर त्याने स्टाफला ब्लॅक कॉफी आणण्याची विनंती केली. या व्हिडिओतील संवाद स्पष्ट ऐकू येत नसला, तरी सचिनचा नम्रपणा, आपुलकी आणि सुनेबद्दलची काळजी चाहत्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या या साधेपणाचं आणि संस्कारांचं भरभरून कौतुक होत आहे. नेटकऱ्यांनी त्याची बरीच स्तुती केली.

सानिया- अर्जुन तेंडुलकरचं लग्न

दरम्यान, सचिन -अंजली तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन आणि सानिया चंडोक यांचा विवाह मार्च 2026 मध्ये मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील असून ती स्वतःही यशस्वी उद्योजिका आहे. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

गुरूपौर्णिमेला सचिन झाला भावूक

सचिन याच्या संस्कारांची आणखी एक झलक गुरुपौर्णिमेलाही पाहायला मिळाली. त्याने, त्याचे बालपणीचे प्रशिक्षक Ramakant Achrekar यांची आठवण काढत सचिनने भावनिक पोस्ट शेअर केली. “ज्यांनी मला केवळ क्रिकेटपटूच नाही, तर एक चांगला माणूस बनवलं, त्यांचे आभार मानणं आजही अपुरंच वाटतं,” अशा शब्दांत सचिनने आपल्या गुरुंना अभिवादन केलं.

मैदानावर विक्रम करणारा हा महान फलंदाज आजही आपल्या साधेपणामुळे आणि माणुसकीमुळे लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत असल्याचं या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती