AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यावेळी मला अस्वस्थ वाटते त्यावेळी मी याठिकाणी… सानिया मिर्झा हिचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, थेट..

सानिया मिर्झा हिने मोठा काळ टेनिसमध्ये गाजवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. नुकताच सानिया मिर्झा हिने तिच्या आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला.

ज्यावेळी मला अस्वस्थ वाटते त्यावेळी मी याठिकाणी... सानिया मिर्झा हिचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, थेट..
Sania Mirza
| Updated on: Apr 01, 2026 | 2:00 PM
Share

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा कायमच चर्चेत असलेले नाव आहे. सानिया गेल्या काही वर्षांपासून दुबईत राहते. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केल्यानंतर दोघांनीही दुबईला राहण्याचा निर्णय घेतला. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचे रस्ते वेगळे झाले, ही वस्तुस्थिती असली तरीही शोएबची साथ सोडल्यानंतरही सानियाने दुबई सोडली नाही. गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांवर मोठे हल्ले होत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट मोठा फटका दुबईलाही बसला आहे. या युद्धादरम्यान सानिया मिर्झा आपले आलिशान घर सोडून भारतात काही दिवस होती. शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सानियाने आलिशान घर दुबईत घेतले. या घरात तिचा मुलगा आणि ती राहते. सानिया मिर्झा हिने बारीक बारीक गोष्टी लक्षात घेऊन घर तयार केले.

पॉम जुमेराहमध्ये सानियाचे घर आहे. सानियाने आपल्या घराबद्दल बोलताना म्हटले की, माझे घर माझ्यासाठी सर्वात सुरक्षित जागा आहे. तिथे एक वेगळेच सुख मिळते. युट्यूब चॅनल लवइन दुबईमध्ये सानिया मिर्झा आपल्या आलिशान घराची झलक दाखवताना दिसत आहे. यादरम्यान सर्वात अगोदर ग्रीक स्टाइलमध्ये बनलेले मोठे पिलर सानियाच्या घरात दिसतात.

हेच नाही तर मुलगा इजहान याच्याकरिता प्ले ग्राऊंड आणि मोठा स्विमिंग पूलही आहे. सानिया मिर्झा हिच्या घरात खास प्रार्थना रूम आहे. ही रूम खास डिझाईन करण्यात आली. यादरम्यान बोलताना सानिया मिर्झा हिने म्हटले की, ज्यावेळी मला अस्वस्थ वाटते, त्यावेळी मी येथेच येऊन बसते. सानिया मिर्झा हिने संपूर्ण घरात जबरदस्त रंगांचे कॉम्बिनेशन केले आहे, लिविंग एरियाही खास आहे.

हेच नाही तर यादरम्यान सानिया मिर्झा हिने तिच्या बेडरूमचीही खास झलक दाखवली. डीप ग्रीन आणि सॉफ्ट व्हाईटचे कॉम्बिनेशन आहे. सानिया मिर्झाचे खास शूज कलेक्शनही बघायला मिळतंय. सानिया मिर्झा हिने पहिल्यांदाच आपल्या घराची झलक दाखवली. सानिया मिर्झा हिचे हे घर अत्यंत आलिशान आहे.

Follow Us
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......