क्रिकेट वर्ल्डकपआधी भारतीय संघाची गुपितं आयपीएलमध्ये उघड?

मुंबई : भारतीय संघ व्यवस्थापन एकिकडे आगामी क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी करत आहे. दुसरीकडे आयपीएलमधील संघासाठी परदेशातील खेळाडूंना नेमण्यावरुन व्यवस्थापन नाराजही दिसत आहे. परदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये नेमण्याच्या धोरणामुळे भारतीय संघाला मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागू शकतं. तसेच काही गंभीर अडचणीही तयार होऊ शकतात, असंही बोललं जात आहे. व्यवस्थापनाची परदेशी खेळाडू नेमण्याच्या धोरणावरील नाराजीमागे अनेक कारणे …

क्रिकेट वर्ल्डकपआधी भारतीय संघाची गुपितं आयपीएलमध्ये उघड?

मुंबई : भारतीय संघ व्यवस्थापन एकिकडे आगामी क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी करत आहे. दुसरीकडे आयपीएलमधील संघासाठी परदेशातील खेळाडूंना नेमण्यावरुन व्यवस्थापन नाराजही दिसत आहे. परदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये नेमण्याच्या धोरणामुळे भारतीय संघाला मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागू शकतं. तसेच काही गंभीर अडचणीही तयार होऊ शकतात, असंही बोललं जात आहे.

व्यवस्थापनाची परदेशी खेळाडू नेमण्याच्या धोरणावरील नाराजीमागे अनेक कारणे आहेत. आयपीएलमध्ये जे खेळाडू संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमले जात आहेत, तेच खेळाडू पुढे जाऊन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये प्रतिस्पर्धी संघाचेही प्रशिक्षक असणार आहेत. भारताचा सलामीवीर खेळाडू शिखर धवन आयपीएलच्या दिल्ली कॅपिटलमध्ये खेळत आहे. दिल्ली कॅपिटलचा प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पॉन्टिंग आहे. हाच पॉन्टिंग पुढे जाऊन क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक असणार आहे. या व्यतिरिक्त पॉन्टिंगसोबत दिल्ली कॅपिटलमध्ये विश्लेषक म्हणून काम करणारा श्रीराम सोमायाजुला देखील श्रीलंकेच्या क्रिकेडट संघासाठी काम करतो.

संबंधित परदेशी प्रशिक्षक धवन सारख्या भारतीय संघातील सलामीवीराची सुक्ष्म माहिती गोळा करतील. तसेच त्याचा उपयोग क्रिकेट विश्वकपामध्ये करतील, असा धोका उत्पन्न होत आहे. त्याचा भारताच्या एकूण कामगिरीवर दुरगामी परिणाम होऊ शकतो. भारताच्या फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे खेळण्याचे गुपित जर प्रतिस्पर्धी खेळाडूंपर्यंत पोहचू शकते. रिषभ, पृथ्वी, श्रेयास या सर्वच खेळाडूंचं परदेशी प्रशिक्षकांकडून विश्लेषण होऊ शकते. त्याचा उपयोग क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये झाल्यास भारताला मोठे नुकसान होऊ शकते.

बीसीसीआयची स्वतःची अशी निश्चित धोरणे आहेत. या धोरणांची अंमलबजावणी जुन्या व्यवस्थापन असो अथवा सर्वोच्च न्यायालयाची समिती दोन्हीकडून होते. दुसरीकडे आयपीलबाबत तसे नाही. तेथे हितसंबंधांचा संघर्ष पहायला मिळतो. तो अगदी सचिन तेंडूलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड अशा दिग्गज खेळाडूंना लागू होत आहे. कारण ते एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाच्या निर्णय प्रक्रियेत आहेत, तर दुसरीकडे आयपीएलच्या कोणत्या ना कोणत्या संघाशी जोडले गेले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *