सेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर

सेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर

सेरेना विलियम्सला दुखापतीमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी सेरेनाला 2021 ची वाट पाहावी लागेल. (Serena Williams has withdrawn from French open)

Yuvraj Jadhav

|

Sep 30, 2020 | 11:54 PM

पॅरिस: जगप्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विलियम्सने फ्रेंच ओपन 2020 स्पर्धेतून माघार घेतली आहे. फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार घेतली. पायाच्या टाचेवरिल मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे सेरेनाला हा निर्णय घ्यावा लागला. सेरेनाला या स्पर्धेत 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती. Serena Williams has withdrawn from French open

सेरेना विलियम्सने ३ वेळा फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. अमेरिका ओपन स्पर्धेनंतर दुखापत बरी होण्यास थोडाच कालावधी मिळाला. मात्र, चालताना त्रास सुरु होता. दुखापतीतून बरी होईन, असे वाटले होते पण ते शक्य झाले नाही, असे सेरेना विलियम्सने सांगितले. दुखापतीमुळे 2020  वाया जाईल, यातून बरे होण्यास 5 ते 6 आठवडे लागणार असल्याचे सेरेनाने स्पष्ट केले.

सेरेना विलियम्सला या दुखापतीमुळे 2020 मधील स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही. 2021 मधील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना सहभागी होऊ शकते. 2017 पासून सेरेना विलियम्स 24 व्या ग्रँडस्लॅमच्या प्रतीक्षेत आहे. फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून सेरेना विलियम्सने माघार घेतल्याचा फायदा स्वेताना पायरनकोवा हिला झाला. यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा 21 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान होत आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थानची सातवी विकेट, श्रेयस गोपाळ आऊट

IPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे

(Serena Williams has withdrawn from French open)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें