IND vs AUS : पिंक बॉल टेस्ट आधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, आपली चिंता मिटली, ऑस्ट्रेलियाच वाढलं टेन्शन

IND vs AUS : एडिलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला अजून एक आठवड्याचा वेळ बाकी आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला प्राइम मिनिस्टर XI विरुद्ध दोन दिवसीय मॅच खेळणार आहे. 2 डिसेंबरला टीम एडिलेडला रवाना होईल.

IND vs AUS : पिंक बॉल टेस्ट आधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, आपली चिंता मिटली, ऑस्ट्रेलियाच वाढलं टेन्शन
Team India Image Credit source: Getty
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 12:10 PM

टीम इंडियाने पर्थ टेस्ट जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरं मोठ चॅलेंज डे-नाइट टेस्ट मॅचच आहे. दुसरा कसोटी सामना एडिलेडमध्ये खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यात पिंक बॉलचा वापर होईल. टीम इंडियाला पिंक बॉलने खेळण्याचा जास्त अनुभव नाहीय. म्हणून हा सामना टीम इंडियासाठी कठीण मानला जातोय. या मॅचला अजून एक आठवड्याचा वेळ आहे. याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. या बातमुळे भारतीय चाहते खुश होतील, पण ऑस्ट्रेलियाच टेन्शन वाढेल.

पिंक बॉल टेस्ट मॅच आधी रोहित शर्माची टीम ऑस्ट्रेलियाच्या प्राइम मिनिस्टर्स XI विरुद्ध दोन दिवसीय डे-नाईट प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला होणारा हा सामना खेळण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू कॅनबरा येथे पोहोचले आहेत. टीम इंडियासाठी नंबर 3 वर खेळणारा शुभमन गिल प्रॅक्टिस करताना दिसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो पर्थ टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार गिल आता दुखापतीमधून पूर्णपणे सावरलाय. त्याच्या अंगठ्याच बँडेज हटवण्यात आलं आहे.

त्याच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळलेला

गिलने नेट्समध्ये थ्रो डाऊनशिवाय आकाश दीप, हर्षित राणा आणि यश दयाल यांच्या वेगवान गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव केला. त्याच पुनरागमन टीमसाठी महत्त्वाच आहे. गिल नंबर 3 वर बऱ्याच काळापासून खेळतोय. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियात फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. गिलने ऑस्ट्रेलियात 3 सामन्यात 51 च्या सरासरीने 259 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशतकं आहेत. पर्थ कसोटीत गिलच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळला होता.

टीम इंडिया एडिलेडला कधी रवाना होणार?

शुभमन गिल भारतीय टीमच्या नेट सेशनमध्ये बॅटिंग करताना दिसला. पण तो डे-नाइट प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळणार की नाही? या बद्दल काही अपडेट नाहीय. तो एडिलेडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. भारतीय टीम 29 नोव्हेंबरला कॅनबरामध्ये प्रॅक्टिस करेल. त्यानंतर 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला प्राइम मिनिस्टर XI विरुद्ध दोन दिवसीय मॅच खेळणार आहे. 2 डिसेंबरला टीम एडिलेडला रवाना होईल.

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.