AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : स्मृती मंधाना राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूची जबरा फॅन

राजस्थानच्या स्टार खेळाडूच्या खेळीने स्मृती मंधाना प्रभावित.| Smriti Mandhana supporting Rajasthan Royals

IPL 2020 : स्मृती मंधाना राजस्थान रॉयल्सच्या 'या' खेळाडूची जबरा फॅन
| Updated on: Oct 01, 2020 | 5:00 PM
Share

नवी दिल्ली : आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) राजस्थान रॉयल्सचा बॅट्समन संजू सॅमसन (Sanju Samson) दमदार कामगिरी करतोय. बॅटिंग आणि फिल्डिंग या अशा दोन्ही आघांड्यावर संजू यशस्वी कामगिरी बजावतोय. संजूने राजस्थानच्या पहिल्या दोन सामन्यात विजयी भूमिका बजावली. त्याच्या या खेळीसाठी अनेक आजीमाजीने खेळाडूंनी त्याचं कौतुक केलं. शशी थरुर यांनी तर संजूला ‘भविष्यातला धोनी’ म्हटलं. यानंतर संजूच्या चाहत्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. संजूने आपल्या खेळीने भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) प्रभावित केलं आहे. (Smriti Mandhana supporting Rajasthan Royals)

स्मृती काय म्हणाली ?

स्मृती मंधानाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत वक्तव्य केलं आहे. “फक्त नि फक्त संजूच्या खेळीमुळे मी राजस्थानला सपोर्ट करतेय, असं स्मृती म्हणाली. संजू सॅमसन दमदार बॅटिंग करतोय, हे एक क्रिकेटपटू म्हणून मला पाहायला आवडतंय. संजूच्या आक्रमक बॅटिंग शैलीमुळे मी त्याची फॅन झाली आहे. या कारणामुळेच मी राजस्थान संघाला सपोर्ट करतेय. संजू सध्या अतुलनीय कामगिरी करतोय. आयपीएलमध्ये काही खेळाडू बोलिंग आणि बॅटिंगने दमदार खेळी करतायेत. अशा खेळाडूंकडून मी शिकण्याचा विचार करीत आहे, असं स्मृती या मुलाखतीदरम्यान म्हणाली.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात संजूने ३ सामन्यात 167 धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यात राजस्थानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने 2 अर्धशतकं लगावली. त्याच्या या कामगिरीसाठी संजूला पहिल्या 2 सामन्यात सलामीवीर पुरस्कारने गौरवण्यात आलं.

स्मृती मंधानाची क्रिकेट कारकिर्द

24 वर्षीय स्मृती मंधानाने भारताचे 51 एकदिवसीय, 75 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. स्मृतीने वनडेमध्ये 2025 धावा केल्या आहेत. तर टी 20 मध्ये 1716 धावांची नोंद आहे.

यंदाच्या स्पर्धेत विकेटकीपरचा बोलबाला

आयपीएलच्या 13 व्या मोसमात भारतीय विकेटकीपर दमदार कामगिरी करत आहेत. यामध्ये संजू सॅमसनचं नाव आघाडीवर आहे. यानंतर लोकेश राहुल, इशान किशन, ऋषभ पंत आणि वृद्धीमान साहा यांचा समावेश आहे. या आयपीएल स्पर्धेतून टीम इंडियामधील धोनीचा वारसदार ठरणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत विकेटकीपर खेळाडूंमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Sanju Samson : “संजू सॅमसनला संधी मिळाली असती, तर त्याने 2019 चा वर्ल्ड कप जिंकून दिला असता”

संजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर भडकला

(Smriti Mandhana supporting Rajasthan Royals)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.