Smriti Mandhana Marriage : पुढचे 12 तास महत्त्वाचे, स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. या विवाहसोहळ्याला काही तास शिल्लक असताना स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

Smriti Mandhana Marriage Postponed : स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. एकीकडे स्मृती आणि पलाश मुच्छल यांच्या विवाहाला अवघे काही तास शिल्लक होते. त्याआधीच ही घटना समोर आली आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागल्यामुळे आता स्मृती मानधाने हिने आपले लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा वडिलांची प्रकृती बरी होईल, तेव्हा लग्न सोहळा नव्याने पार पाडला जाईल, असे स्मृती मानधानच्या मॅनेजरकडून सांगण्यात आले आहे. असे असतानाच आता श्रीनिवस मानधना यांच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. श्रीनिवास मानधना यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच त्यांना नेमके काय झाले आहे? याबाबतची माहिती दिली आहे.
डॉक्टर काय म्हणाले?
श्रीनिवास मानधना यांच्यावर उपचार करणारे नमन शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना हृदयविकार असल्याची लक्षणे आहेत, असे नमन शहा यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या रक्ताच्या अनेक चाचण्या करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.
अँन्जिओग्राफी करावी लागू शकते
श्रीनिवास मानधना यांच्या छातीत दुखत आहे. त्यांना हृदयविकाराची सौम्य लक्षणे आहेत. लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . त्यांचा रक्तदाब वाढलेला आहे. रक्तातील एन्झाईम वाढलेले असल्याचे सांगत गरज पडली तर अँन्जिओग्राफी करावी लागू शकते, अशी शक्यताही शाह यांनी व्यक्त केली आहे. डॉक्टर शाह यांच्या माहितीनुसार श्रीनिवास मानधना यांना यापूर्वी हृदयासंबंधीचा कोणताही जुना त्रास नव्हता. आता त्यांना 12 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकललं
दरम्यान, वडिलांच्या प्रकृतीकडे पाहून स्मृतीने आपले लग्न पुढे ढकलले आहे. या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. संगीत नाईट, हळदी समारंभ मोठ्या उस्ताहात पार पडला होता. लग्नाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले होते. असे असतानाच श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तडकाफडकी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
