Smriti Mandhana : स्मृती मानधना हिच्यापूर्वी या महिला खेळाडूचंही तुटलं हृदय , साखरपुड्यानंतर मोडलं लग्न, थेट पाकिस्तानी क्रिकेटर…
Sania Mirza also called off engagement : महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिचं लग्न मोडलं आहे. कालच तिने याविषयी घोषणा केली. 23 नोव्हेंबरला तिचं पलाश मुच्छलशी लग्न होणार होतं, मात्र तिच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आलं. नंतर 15 दिवसांनी स्मृतीने लग्न मोडल्याची घोषणा केली. यापूर्वी आणखी एका महिला खेळाडूनेही साखरपुड्यानंतर लग्न मोडण्याचा कठीण निर्णय घेतला होता.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने काल ( रविवार 7 डिसेंबर) संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी ठरलेलं लग्न मोडल्याची घोषणा केली. 23 नोव्हेंबर रोजी सांगलीमध्ये दोघांचा विवाह होणार होता, पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर पलाशशी संबंधित एकेक चर्चा, बातम्या समोर येऊ लागल्या, काही चॅट्सही उघड झाली. पलाशने स्मृतीला फसवलं अशाही चर्चा सुरू झाल्या, या सगळ्या चर्चा , गोंधळानंतर अखेर काल दोघांचही लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र एखाद्या महिला खेळाडूच्या आयुष्यातील एखादं महत्वाचं नातं संपण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी असं झालं होतं. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हाचा साखरपुडा मोडला होता.
खरंतर सानिया मिर्झा हिचं लग्न माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी झालं होतं, 14 वर्षानंतर ते विभक्तही झाले. पण शोएब याच्याशी लग्न होण्यापूर्वी सानिया हिचा दुसऱ्या एका व्यक्तीशी साखरपुडा झाला होता. मात्र ते नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि त्याआधीच ते मोडलं. बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल की 2009 साली सानिया मिर्झा हिचा साखरपुडा झाला होता, पण 6 महिन्यांतच ते नातं मोडलं. साखरपुड्यानंतर काही दिवसांतच सानिया आणि तिचा होणारा पती यांना ही जाणीव झाली की ते दोघं एकमेकांसाठी अनुरूप नाहीयेत. याच कारणामुळे त्या दोघांनी परस्पर सहमतीने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला आणि (एकमेकांशी) लग्न केलं नाही.
कोणाशी झाला होता सानिया मिर्झाचा साखरपुडा ?
सानिया हिचा साखरपुडा सोहराब मिर्झा याच्याशी झाला होता, तो हैदराबादमधील प्रसिद्ध “यूनिव्हर्सल बेकर्स” चे मालक आदिल मिर्झा यांचा मुलगा आहे. सानिया आणि सोहराब शाळेपासून एकमेकांना ओळखायचे. 10 जुलै 2009 मध्ये एका खासगी समारंभात कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाला होता.
सानिया-सोहराबची कशी झाली भेट ?
सोहराब मिर्झा याने हैदराबादच्या सेंट मेरी कॉलेजमधून कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं. सानियाही त्याच कॉलेजमध्ये शिकली होती. दोघांच्या वयात अवघ्या एका वर्षाचा फरक होता, सोहराब सानियापेक्षा मोठा आहे. दोघांचीही लहानपणापासूनच ओळख होती.
का मोडला सानियाचा साखरपुडा ?
रिपोर्ट्सनुसार, सोहराबने सांगितलं की त्या दोघांमध्ये पहिल्यापासूनच मतभेद होते. त्या दोघांच्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांमध्ये मैत्री होती आणि सानिया-सोहराब खूप वर्ष एकमेकांना ओळखत होते. पण त्यांचा साखरपुडा झाल्यावर त्यांना असं वाटू लागलं की ते एकमेकांसाठी अनुरूप नाहीत. त्यांचा साखरपुडा अचानक मोडला नाही, पण हे नातं पुढे जाऊ शकणार नाही याची सोहराबला कल्पना आली होती. त्यांचा साखरपुडा नंतर मोडला.
त्यानंतर सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांची भेट झाली, त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. अखेर 2010 साली त्यांचं लग्न झालं. मात्र लग्नाच्या 14 वर्षानंतर सानिया आणि शोएब हे दोघे विभक्त झाले. त्या दोघांना एक मुलगा आहे, तो सानियासोबत दुबईत राहतो. तर शोएब मलिक याने अभिनेत्री सना जावेद हिच्याशी लग्न केलं.
