SMAT 2025 : अशोक शर्माच्या भेदक गोलंदाजीचं दर्शन, स्पर्धेत घेतल्या 19 विकेट; कोण आहे ते जाणून घ्या
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत खेळाडू आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत आहेत. टी20 स्पर्धा असल्याने फलंदाजांचा गवगवा जास्त आहे. असं असताना वेगवान गोलंदाज अशोक शर्माने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने 7 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धा ही टी20 फॉर्मेटमध्ये आहे आणि टी20 फॉर्मेट म्हंटलं की फलंदाजांचा दबदबा… पण असं असताना एका गोलंदाजांना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण त्याने अवघ्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे फलंदाजांच्या गर्दीत आता या गोलंदाजाची चर्चा होत आहे. उजव्या हाताचा वेगवाने गोलंदाजाने आतापर्यंत स्पर्धेत 19 विकेट घेतल्या आहे. वेगासह चेंडू स्विंग करण्यात या खेळाडूचा हातखंडा असल्याचं दिसून आलं आहे. आपल्या भेदक गोलंदाजीमुळे त्याने तामिळनाडू आणि कर्नाटकसारख्या संघांना चक्रव्यूहात अडकवलं. पण अशोक शर्मा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भेदक गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. इतकंच काय तर आयपीएल स्पर्धेपूर्वी त्याच्या या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं आहे.
कोण आहे अशोक शर्मा?
अशोक शर्मा हा जयपूरच्या रामपुरा गावात राहणार आहे. त्याच्या वडिलांचं नाव नाथू लाल शर्मा आहे. अशोकचा जन्म 17 जून 2002 चा आहे. 23 वर्षांच्या अशोक वर्माने शाळेय जीवनात क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला. अशोकने 2017मध्ये जयपूर क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवले. अशोक शर्मा 130 ते 140 च्या वेगाने गोलंदाजी करता होता आणि एका स्पर्धेत फ्रेंचायझीचं लक्ष वेधून घेतलं. राजस्थान रॉयल्सने या संधीचं सोनं केलं आणि टीमचा नेट गोलंदाज होण्याची संधी दिली. 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 55 लाख रुपये मोजून त्याला संघात घेतलं पण एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
View this post on Instagram
2025 आयपीएल स्पर्धेत अशोक शर्माला राजस्थान रॉयल्स संघात एन्ट्री मिळाली आहे. फ्रेंचायझीने त्याला 30 लाखांच्या बेस प्राईसवर संघात घेतलं आहे. पण त्याला येथेही खेळण्याची संधी मिळाली नाही. पण सध्या अशोक शर्माचा फॉर्म पाहता 2026 स्पर्धेत नक्कीच संधी मिळेल असं वाटत आहे. दरम्यान, अशोक शर्माचं राजस्थानच्या अंडर 19 संघात निवड झाल्यानंतर त्याला पहिला मोठा धक्का बसला होता. कारण एकीकडे आनंद होता आणि दुसरीकडे, कोविडमुळे त्याच्या प्रशिक्षकाचं निधन झालं होतं. त्या धक्क्यातून सावरत अशोक शर्माने क्रिकेटचे धडे गिरवले आणि आता या स्तरापर्यंत पोहोचला आहे.
