AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kagiso Rabada | आई वकील, वडील डॉक्टर, रग्बी टीममध्ये स्थान न मिळाल्याने क्रिकेटला पसंती, रबाडाचा रंजक प्रवास

या गोलंदाजाने वनडे पर्दापणातील सामन्यात हॅट्रिक घेतली आहे. (interesting Cricket journey of Kagiso Rabada)

Kagiso Rabada | आई वकील, वडील डॉक्टर, रग्बी टीममध्ये स्थान न मिळाल्याने क्रिकेटला पसंती, रबाडाचा रंजक प्रवास
| Updated on: Oct 06, 2020 | 5:31 PM
Share

नवी दिल्ली : अनेक क्रिकेटपटूंना क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्येही जास्त रस असतो. यामध्ये युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal)उल्लेख करता येऊ शकतो. चहलला क्रिकेटमध्ये येण्याआधी बुद्धीबळाचे (Chess) वेड होते. तसंच एका खेळाडूला रग्बी खेळात (Rugby) आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं होतं. मात्र दुर्देवाने त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही. पण त्याने हार मानली नाही. रग्बीमध्ये यश आले नाही. मात्र त्याने क्रिकेटमध्ये नशीब आजमावलं. आणि आज तो आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील यशस्वी गोलंदाज ठरला आहे. (interesting Cricket journey of Kagiso Rabada)

आपण बोलतोय दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाबद्दल (Kagiso Rabada). कगिसो रबाडाचा जन्म 25 मे 1995मध्ये झाला. कगिसोची आई वकील तर वडील डॉक्टर. सुरुवातीला कगिसोने रग्बीत भविष्य करायचं ठरवलं. त्याची शालेय स्तरावर रग्बी टीमसाठी निवड झाली. रग्बीमधून वेळ मिळाल्यानंतर कगिसो क्रिकेटदेखील खेळायचा. त्यामुळे कगिसो दोन्ही खेळात निपूण झाला. मात्र एकदा कगिसोची क्रिकेट आणि रग्बी या दोन्ही खेळांसाठी निवड करण्यात आली नाही. तेव्हापासून कगिसोच्या यशस्वी गोलंदाज बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

आयपीएलच्या 13 व्या मोसमात 12 विकेट्स

कगिसो रबाडा ताज्या आकडेवारीनुसार आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रबाडाने दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळताना 5 सामन्यात 12 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. रबाडाने यामध्ये विराट कोहली सारख्या फलंदाजांच्या दांड्या गूल केल्या आहेत. यासह पर्पल कॅप आतापर्यंत कगिसोकडे आहे.

350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स

कगिसोने 2014 साली टी 20 क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. तेव्हापासून ते आतापर्यंत कगिसोने दक्षिण आफ्रिकेचं एकूण 24 टी-20, 75 एकदिवसीय आणि 43 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. या सर्व सामन्यात कगिसोने आतापर्यंत 350 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची किमया केली आहे. कगिसोने 24 टी-20 सामन्यात 30 विकेट्स घेतल्या आहेत. तर 75 वनडेत 117 विकेट्स बळी घेतले आहेत. तसेच 47 कसोटी सामन्यात 197 खेळाडूंना बाद केलं आहे.

वनड पर्दापणात हॅट्रिक कामगिरी

कगिसोने 10 जुलै 2015 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्ध पदार्पण केलं. या पर्दापणाच्या सामन्यातच त्याने दणकेदार कामगिरी केली. कगिसोने या सामन्यात एकूण 8 ओव्हर टाकल्या. यात त्याने 16 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे यात हॅट्रिकचा समावेश होता. तसेच 8 पैकी 3 ओव्हर मेडन टाकल्या. अशी असाधारण कामगिरी खगिसोने वनडे पदार्पणात केली.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : विराट कोहली ICC चे नियम विसरला, मागितली पंचांची माफी

IPL 2020 | बंगळुरु विरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीला मोठा फटका, ‘हा’ अनुभवी खेळाडू स्पर्धेबाहेर

IPL 2020, MI vs RR : हिटमॅन रोहित शर्माला सुरेश रैनाचा विक्रम मोडण्याची संधी

(interesting Cricket journey of Kagiso Rabada)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.