9 वर्षांत 4 डाव खेळला, चारही डावांत धडाकेबाज शतकं, ‘तोच’ संयमी पण तितकाच आक्रमक बॅट्समन कोण?

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा सलामीवीर एलन मेलविले (Alan melville). आज त्यांचा वाढदिवस, त्याचनिमित्ताने आपण त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर टाकूयात...! (South African Opener Batsman Alan melville Birthday Special Story)

9 वर्षांत 4 डाव खेळला, चारही डावांत धडाकेबाज शतकं, 'तोच' संयमी पण तितकाच आक्रमक बॅट्समन कोण?
फोटो : प्रतिकात्मक
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 9:54 AM

मुंबई :  क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये सलग चार शतकं ठोकणं हे काही सोपं काम नाहीय. जरी अनेक खेळाडूंनी असा धडाकेबाज प्रकार करुन दाखवला असला तरी अशी कामगिरी करायला कोणत्या खेळाडूने यासाठी 9 वर्षांचा कालावधी घेतला नसेल. आज आपण ज्या क्रिकेटपटूविषयी बोलत आहोत, त्याने असाच काहीसा कारनामा केला होता. या खेळाडूने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत केवळ 11 कसोटी सामने खेळले. यामध्ये 52 च्या सरासरीने त्याने 4 शतके ठोकली. विशेष म्हणजे ही 4 शतक त्याने एकापाठोपाठ एक सलग चार डावांमध्ये ठोकली. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे चार डाव तो नऊ वर्षांदरम्यान खेळला. हा फलंदाज आहे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर एलन मेलविले (Alan melville). आज त्यांचा वाढदिवस, त्याचनिमित्ताने आपण त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर टाकूयात…! (South African Opener Batsman Alan melville Birthday Special Story)

9 वर्षांत 4 डावांत 4 शतकं

नऊ वर्षात एलनने चार डावांमध्ये चार शतके ठोकल्याची गोष्ट त्यावेळी चर्चेत आली जेव्हा 1938-39 मध्ये डर्बन टेस्टमध्ये त्यांनी धमाकेदार शतक ठोकत 103 धावा केल्या. दुसर्‍या महायुद्धापूर्वी दक्षिण आफ्रिकेची ही शेवटची टेस्ट मॅच होती. यानंतर 1947 मध्ये इंग्लंडच्या भूमीवर त्यांनी पुढील तीन डावात 189, नाबाद 104 आणि नाबाद 117 धावा केल्या, म्हणजेच 9 वर्षांदरम्यान त्यांनी चार डावांत सलग 4 शतके झळकावली!

ही 4 शतकं ठोकायच्या अगोदर एललने 67 आणि 78 धावांची खेळी केली होती. दुर्भाग्याची गोष्ट ही की चार शतकं ठोकल्यानंतर पुढच्या 13 डावांमध्ये एलनला केवळ एकदाच अर्धशतक ठोकता आले. यादरम्यान ते फॉर्मसाठी झगडताना दिसले. त्यामुळे त्यांच्या बॅटमधून रन्स निघत नव्हते.

असं राहिलं मेलविलेचं क्रिकेट करिअर

उजव्या हाताचा फलंदाज मेलविलेने साऊथ आफ्रिकेकडून 11 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 52.58 च्या सरासरीने 894 धावा केल्या. यात चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यामधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या 189 इतकी होती. याचदरम्यान एलनने 190 प्रथम श्रेणी सामनेही खेळले. यामध्ये त्याने 10598 धावा ठोकल्या.

यादरम्यान त्यांची सरासरी 37 37. इतकी होती, तर त्याने प्रथम श्रेणीत आपल्या बॅटने 25 शतके आणि 53 अर्धशतकंही झळकावली. एलनने प्रथम श्रेणी सामन्यांत 156 झेल देखील घेतले. 1934 आणि 1935 मध्ये काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्सचं कर्णधारपद देखील भूषवलं. वयाच्या 72 व्या वर्षी 1983 मध्ये ट्रान्सवालमध्ये त्यांचे निधन झाले.

(South African Opener Batsman Alan melville Birthday Special Story)

हे ही वाचा :

WTC फायनलमध्ये ‘मालिकावीर’ पुरस्कार कोण पटकवणार?, 3 खेळाडू शर्यतीत, एका भारतीय खेळाडूची दावेदारी!

Team India ची डोकेदुखी ठरलेल्या Tim Southee ने पुन्हा चेतवलं, WTC फायनलअगोदर थेट कोहलीला इशारा

ना सचिन, ना रोहित, ना विराट; अर्जुन तेंडुलकरचा आवडता क्रिकेटर कोण? चकित करणारं उत्तर!

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.