श्रीलंकेचा फिरकीपटू मलिंदा पुष्पकुमाराने रचला इतिहास, नावावर केले 1000 विकेट
Malinda Pushpakumara Record: श्रीलंकेचा फिरकीपटू मलिदा पुष्पकुमाराने याने क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1000 विकेट घेण्याचा विक्रम रचला आहे. अशी कामगिरी करणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.

Malinda Pushpakumara 1000-Wickets: क्रिकेटविश्वात विक्रम रचले आणि मोडले जातात. पण काही विक्रम हे लगेच होत नाही. त्यासाठी क्रिकेटमध्ये मोठा काळ काढावा लागतो. कारण हा विक्रम काय एका दुसऱ्या सामन्यात होत नाही. यासाठी बराच घाम गाळावा लागतो आणि सातत्यपूर्ण कामगिरी आवश्यक आहे. असाच एक विक्रम श्रीलंकेचा फिरकीपटू मलिंदा पुष्पकुमारा याने रचला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मलिंदा पुष्पकुमाराने या विक्रमाची नोंद केली आहे. डावखुरा फिरकीपटू मलिंदाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1000 विकेटचा पल्ला गाठला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाचा चौथा श्रीलंकन क्रिकेटपटू ठरला आहे. तर जगातील 218वा खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1374 विकेट घेतल्या आहे. तर रंगना हेराथने 1080, दिनुका हेट्टियाराचीने 1001 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. आता या यादीत मलिंदा पुष्पकुमाराचं याचं नाव जोडलं गेलं आहे.
पुष्पकुमारा कोल्ट्स क्रिकेट क्लब ग्राउंडमध्ये गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या नावावर 998 विकेट होत्या. त्याने मूर स्पोर्ट्स क्लबच्या दोन विकेट काढल्या आणि हजारी गाठली. त्याने विकेटकीपर सोहन डी लिवेरा आणि पासिंदु सूरियाबंदारा यांना बाद करत हा पल्ला गाठला. पुष्पकुमाराने श्रीलंकेसाठी बेस्ट स्ट्राईक रेटने 1000 विकेट काढल्या आहेत. त्याने मुरलीधरनलाही मागे टाकले आहे. पुष्पकुमाराने फक्त 38.3 च्या स्ट्राईक रेटने या विकेट काढल्या आहेत. मुरलीधरनचा स्ट्राईक रेट हा 48.7चा आहे. दिनुका हेत्तियाराची स्ट्राईक रेट हा 46.6 आहे. पुष्पकुमाराचा बॉलिंग एव्हरेजदेखील चांगला आहे. त्याने 20.06 च्या एव्हरेजने विकेट काढल्या आहेत. पुष्पकुमाराने 86वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. तर 28 वेळा 10 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये इतकी चांगली कामगिरी करूनही पुष्पकुमारा श्रीलंकेसाठी फक्त 4 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 14 विकेट घेतल्या आहे. वनडेत 2 सामने खेळला असून एक विकेट घेतली आहे. मलिंदाने जानेवारी 2019 मध्ये एकाच डावात 10 विकेट घेतल्या. साराकेन्स स्पोर्ट्स क्लबच्या विरुद्ध 37 धावा देऊन 10 विकेट काढल्या. या विकेट त्याने फ्कत 18.4 षटकात घेतल्या होत्या. याच सामन्यात त्याने 700 विकेटचा टप्पा पूर्ण केला होता.
