Mumbai Mayor | मुंबईत शिंदेंचा महापौर होणार की नाही? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
एकनाथ शिंदे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत त्यामुळे 'आम्हाला देव पाण्यात ठेवण्याची आवशक्यता नाही' एकनाथ शिंदे, सर्व निर्णय पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन घेतात, आत्तापर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय हे अचूक होते. असंही शिरसाट म्हणाले
मुंबईचा महापौर कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र महापौर नक्की कोणाचा शिंदेंचा की भाजपचा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यावर भाष्य करीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले होते, कोणालाही सहजपणे मुंबईत महापौर बसवणं सोपं नाही. कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही असंही राऊत म्हणाले होते. मुंबईत कोणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, अजून ठाकरेंच्या शिवसेनेने काही ठरवलं नाही, मी मजा बघतोय असं राऊत म्हणाले. भाजपचा महापौर होऊ नये म्हणून सहकारी पक्ष देव पाण्यात ठेऊन बसलेत असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावला आहे.
यावर शिवसेना पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्यूत्तर दिलंय, एकनाथ शिंदे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत त्यामुळे ‘आम्हाला देव पाण्यात ठेवण्याची आवशक्यता नाही’ एकनाथ शिंदे, सर्व निर्णय पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन घेतात, आत्तापर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय हे अचूक होते. असंही शिरसाट म्हणाले

