शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा, अभिजित कटके, रिशांक देवाडिगाला मानाचे पुरस्कार

शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या 2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली (State sports awards) आहे.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा, अभिजित कटके, रिशांक देवाडिगाला मानाचे पुरस्कार
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 7:07 PM

मुंबई : शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या 2018-19 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली (State sports awards) आहे. यात कुस्तीमहर्षी पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांना शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. तर 5 जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

यात युवराज खटके, सांगली (अॅथलेटिक्स), बाळासाहेब आवारे, बीड (कुस्ती), नितीन खत्री, पुणे (तायक्योंदो), जगदीश नानजकर, पुणे (खो-खो), अनिल बंडू पोवार, कोल्हापूर (पॅरा अॅथलेटिक्स) यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिला जाणार आहे.

तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची (खेळाडू गट) यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कबड्डी खेळात पुरुष गटातून रिशांक देवाडिगा आणि गिरीष इरनक तर महिला गटातून सोनाली शिंगटे हिला पुरस्कार जाहीर झाला आहे. कुस्ती खेळासाठीचा राज्य क्रीडा पुरस्कार अभिजित कटके याला दिला जाणार (State sports awards) आहे.

त्याशिवाय साहसी गटात चौघांना राज्य क्रीडा पुरस्कार मिळणार आहे. यात खाडी पोहणे यासाठी प्रभात कोळी आणि शुभम वनमाली यांना पुरस्कार दिला जाणार आहे. तर गिर्यारोहणासाठी अपर्णा प्रभूदेसाई आणि सागर बडवे यांना राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

तर स्वप्निल पाटील (जलतरण), पार्थ हेंद्रे (जलतरण), सायली पोहरे (जलतरण) या तिघांना दिव्यांग खेळाडू गटातील राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर जयदीपकुमार सिंह याला ज्युदो आणि वैष्णवी सुतार हिला टेबल टेनिस खेळासाठी पुरस्कार दिला जाणार (State sports awards) आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.