AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Eng : चौकार षटकारांची लयलूट करणारा हा विस्फोटक बॅट्समन भारतीय संघात पदार्पण करणार!

भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना पार पडत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवचं (Suryakumar yadav) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण होण्याची शक्यता आहे.

Ind Vs Eng : चौकार षटकारांची लयलूट करणारा हा विस्फोटक बॅट्समन भारतीय संघात पदार्पण करणार!
Suryakumar yadav
| Updated on: Mar 26, 2021 | 12:46 PM
Share

पुणेभारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना पार पडत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवचं (Suryakumar yadav) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण होण्याची शक्यता आहे. चौकार षटकारांची लयलूट करणारा विस्फोटक बॅट्समन म्हणून सूर्यकुमार यादवची ओळख आहे. मधल्या फळीतील बॅट्समन श्रेसर अय्यरला दुखापत झाल्याने सूर्यकुमार यादवचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण होण्याची शक्यता आहे. (Suryakumar Yadav May Debut India vs England In 2nd Odi MCA Pune)

इंग्लंड विरुद्ध टी 20 मालितेत पदार्पण

सूर्यकुमार यादवने इंग्लंड विरुद्ध टी -२० मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरच्या बोलिंगवर त्याने जोरदार षटकाराने खाते उघडले. 31 चेंडूंच्या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

याशिवाय पाचव्या टी -20 सामन्यात सूर्याने अवघ्या 17 चेंडूत 32 धावा फटकावल्या. या खेळीत 3 चौकार आणि षटकार होते. आजच्या सामन्यात श्रेयस अय्यर दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. तेव्हा सूर्यकुमारचं पदार्पण नक्की मानलं जातंय.

प्लेइंग 11 मध्ये एक बदल होऊ शकतो.

मात्र, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील हा एक बदल वगळता आणखी फेरबदल होण्याची आशा नाही. शिखर धवन 98 धावा काढून फॉर्ममध्ये परतला आहे, तर रोहित शर्मा चांगली सुरुवात करत असून एक मोठा डाव त्याच्यापासून फार दूर नाही. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या आणि केएल राहुल यांच्यामुळे भारताची बॅटिंग लाईनअप तगडी आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

शिखर धवन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्‍वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

हे ही वाचा :

India Vs England 2nd ODI Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा वन डे सामना, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

3 बॅट्समन 99 रन्सवर आऊट, नर्व्हस नाईन्टीजचा ‘नकोसा रेकॉर्ड’!, पाहा एकाच मॅचमध्ये काय काय घडलं…?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.