AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीसीएसने TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वात पटकावलं जेतेपद

TV9 Corporate Badminton Championship: टीव्ही9 नेटवर्क कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप सीझन 2 च्या अंतिम सामन्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) सनसनाटी कामगिरी करत ॲमेझॉनला पराभूत केले.

टीसीएसने TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वात पटकावलं जेतेपद
टीसीएसने TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वात पटकावलं जेतेपदImage Credit source: TV9 Network
| Updated on: May 18, 2026 | 3:08 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्क कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप सीझन 2 मोठ्या दिमाखात पार पडलं. या पर्वात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने ॲमेझॉनवर रोमांचक विजय मिळवून जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात दोन्ही दिग्गज कंपन्यांमध्ये अंत्यत चुरशीचा सामना झाला. ॲमेझॉन संघाने सुरुवातीच्या टप्प्यात वर्चस्व गाजवले आणि 21-11, 21-12 अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळवत पहिले दोन गेम जिंकले. तिसरा गेम 21-17 ने जिंकून संघाने आपली स्थिती आणखी मजबूत केली. तीन गेमने मागे असून आणि प्रचंड दबावाखाली असूनही टीसीएस संघाने विलक्षण धैर्य, चिकाटी आणि दृढनिश्चय दाखवला. उत्कृष्ट रणनीती अंमलात आणून एक असाधारण पुनरागमन घडवले. टीसीएसने 21-17, 21-18, 21-15 आणि 21-16 अशा गुणांनी सलग चार गेम जिंकून ॲमेझॉन संघाला बॅकफूटवर ढकललं आणि जेतेपद पटकावलं.

टीव्ही 9 नेटवर्क कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप सीझन 2 स्पर्धेच्या अंतिम फेरीत तीन सेट गमवल्यानंतर टीसीएस कमबॅक करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण सात गेमच्या या लढतीत टीसीएसचा लढाऊ बाणा, सांघिक भावना आणि चिकाटी दिसून आली. कारण या संघाने पराभवाच्या उंबरठ्यावरून मुसंडी मारत विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली. त्यांच्या खेळाडूंनी दबावाखाली असूनही हार मानली नाही. हातातून गेलेला सामना खेचून आणला आणि विजय मिळवला. त्यामुळे ॲमेझॉनला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. दरम्यान, इन्फोसिसने तिसरे स्थान पटकावले आणि त्यांच्या प्रभावी कामगिरीबद्दल प्रशंसा मिळवली.

वैयक्तिक गटांमध्ये ग्लान्सच्या प्रज्वल निलावगाने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले, तर एन रंगा राव अँड सन्सच्या चिन्मयीने महिला एकेरीत विजय मिळवला. रायनच्या राहुल आणि भार्गवी यांनी मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. टीव्ही९ नेटवर्कने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय चॅम्पियनशिपने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडीवृत्ती आणि सांघिक भावनेला यशस्वीपणे प्रोत्साहन दिले. सर्व सहभागी संघांनी दाखवलेली एकता, उत्साह आणि स्पर्धात्मक वृत्तीमुळे ही स्पर्धा एक अविस्मरणीय सोहळा ठरली.

Follow Us
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....