AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? भारतीय कोचचं मोठ स्टेटमेंट

Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने रांचीमध्ये एक शानदार शतक झळकावलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात तो टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरला. या दमदार इनिंगनंतर भारताचे फलंदाजी कोच सितांशु कोटक यांनी विराटच्या फ्यूचरबद्दल एक मोठं स्टेटमेंट केलं आहे.

Virat Kohli : विराट 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? भारतीय कोचचं मोठ स्टेटमेंट
Virat Kohli Image Credit source: PTI
| Updated on: Dec 01, 2025 | 10:07 AM
Share

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज सुरु झाली आहे. काल पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली एक शानदार इनिंग खेळला. कोहलीने 120 चेंडूत 135 धावा केल्या. यात 11 फोर आणि 7 सिक्स होते. विराटच्या या शतकी खेळीमुळे भारताने पहिला वनडे सामना 17 धावांनी जिंकला. विराटच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असताना त्याने ही शानदार शतकी खेळी केली. रिपोर्टनुसार या सीरीजनंतर बीसीसीआय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्याबद्दल एक बैठक करणार आहे. या शतकी खेळीनंतर विराटने आपली दावेदारी अजून मजबूत केली आहे. भारताचे फलंदाजी कोच सितांशु कोटक यांनी विराटच्या फ्यूचरबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहली आता 37 वर्षांचा आहे. पण त्याच्या प्रदर्शनात अजून घसरण झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये तो फॉर्ममध्ये दिसतोय. विराट 9 महिन्यानंतर भारतात आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. तो एक मोठी इनिंग खेळण्यात यशस्वी ठरला. रोहितसोबत दुसऱ्याविकेटसाठी त्याने 136 धावांची भागिदारी केली. भारताचे फलंदाजी कोच सितांशु कोटक यांनी कोहलीच्या फलंदाजीचं कौतुक केलं. “ही एक सुंदर इनिंग होती. तो खरच सुंदर खेळला. फक्त वनडे फॉर्मेटच नाही. विराटने सर्वच फॉर्मेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केलय” असं सितांशु कोटक म्हणाले.

त्यावर प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही

सितांशु कोटक यांनी विराट कोहलीच्या फ्यूचरबद्दल एक मोठं वक्तव्य केलं. विराट कोहली 2027 वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार का? असा प्रश्न सितांशु कोटक यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “हे सगळं लक्षात घेण्याची गरज का आहे? हे मला समजत नाही. तो खरच चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या भविष्याबद्दल बोलायची गरज आहे, असं मला वाटत नाही. तो ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय ते कमाल आहे. ज्या प्रकारचा त्याचा फिटनेस आहे, त्यावर प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही”

भारतीय फॅन्ससाठी सुद्धा ते चांगले संकेत

विराट कोहली सोबत रोहित शर्मा सुद्धा या मॅचमध्ये दमदार इनिंग खेळला. त्याने 51 चेंडूत 57 धावा केल्या. यात 5 फोर आणि तीन सिक्स होते. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुद्धा रोहित शर्मा प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरलेला. टीम इंडियासोबत भारतीय फॅन्ससाठी सुद्धा ते चांगले संकेत आहेत. सीरीजचे पुढचे सामने सुद्धा या दोघांसाठी महत्वाचे राहणार आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.