Retirement : रोहित-विराटची चर्चा, पण भारताच्या दुसऱ्या एका मोठ्या खेळाडूने जाहीर केली निवृत्ती
Retirement : सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार ही चर्चा सुरु आहे. मात्र, या दरम्यान टीम इंडियाच्या दुसऱ्याच एका मोठ्या खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केलीय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. असा अचानक निर्णय घेण्यामागे काय कारण आहे?.

सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. दोघे वनडेमधून कधी निवृत्ती जाहीर करणार? हा प्रश्न तमाम क्रिकेट रसिकांना पडलेला आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीने T20 आणि टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या दोघांच्या निवृत्तीची चर्चा असताना, भारताच्या एका मोठ्या खेळाडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटनंतर अश्विनने आता आयपीएलमधूनही रिटायरमेंट जाहीर केली आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. एक्स हँडलर अश्विनने आयपीएलमधून रिटायरमेंट घेत असल्याचं जाहीर केलं. अश्विनने या निर्णयामागचं कारणही सांगितलं. अश्विन आयपीएलमध्ये एकूण पाच टीम्सकडून खेळला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो एकूण 221 सामने खेळला.
अश्विनने एक्स हँडलवर लिहिलय की, “हा आयुष्यातील खास दिवस आहे. असं म्हणतात की, प्रत्येक गोष्टीचा शेवट आयुष्यात एक नवीन सुरुवात असते. माझ्या गोष्टीमध्ये सुद्धा असचं काहीतरी आहे” अश्विनने निवृत्ती जाहीर करताना त्याने आय़पीएल, BCCI आणि ज्या फ्रेंचायजींकडून खेळला, त्या सर्वांचे आभार मानले.
Special day and hence a special beginning.
They say every ending will have a new start, my time as an IPL cricketer comes to a close today, but my time as an explorer of the game around various leagues begins today🤓.
Would like to thank all the franchisees for all the…
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 27, 2025
निवृत्ती का घेतली?
आता प्रश्न हा आहे की, रविचंद्रन अश्विनने अचानक आयपीएलमधून निवृत्ती का जाहीर केली?. निवृत्ती जाहीर करताना अश्विन म्हणाला की, प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात घेऊन येते. त्याच्या याच शब्दांमध्ये निर्णयाचं कारण दडलेलं आहे. अश्विनची नजर आता दुसऱ्या देशांच्या T20 लीगवर आहे. तिथे त्याला खेळायचं आहे. त्यासाठी आयपीएलमधून निवृत्त होणं आवश्यक होतं.
CSK कडून करिअरची सुरुवात
अश्विनच्या आयपीएल करिअरबद्दल बोलायच झाल्यास तो 16 वर्षात 5 टीम्सकडून खेळला. वर्ष 2009 मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या सीजनमध्ये त्याने डेब्यु केलेला. CSK कडून त्याच्या आयपीएल प्रवासाला सुरुवात झाली. CSK मध्येच असताना त्याचा प्रवास संपला. अश्विन आयपीएल 2025 मध्ये सीएसके टीमचा भाग होता. या दरम्यान तो रायजिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला. अश्विन एकूण 221 IPL सामने खेळला. त्यात त्याने 187 विकेट्स घेतले. त्याशिवाय एक अर्धशतक आणि 833 धावा केल्या.
