राजस्थान ते चेन्नई... आयपीएलमध्ये आतापर्यंत इतिहास रचणारे संघ

मुंबई : इंडियन प्रिमीअर लीगच्या यंदाच्या मोसमातील शेवटचा सामना आज 12 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात खेळला जाणार आहे. हैदराबादाच्या राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगणार आहे. या दोन्ही  संघांनी आतापर्यंत तीन-तीन वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावे केला आहे. यंदा आयपीएलचा हा 12 वा मोसम आहे. यापूर्वीच्या 11 मोसमांमध्ये कोण आणि …

राजस्थान ते चेन्नई... आयपीएलमध्ये आतापर्यंत इतिहास रचणारे संघ

मुंबई : इंडियन प्रिमीअर लीगच्या यंदाच्या मोसमातील शेवटचा सामना आज 12 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात खेळला जाणार आहे. हैदराबादाच्या राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगणार आहे. या दोन्ही  संघांनी आतापर्यंत तीन-तीन वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावे केला आहे. यंदा आयपीएलचा हा 12 वा मोसम आहे. यापूर्वीच्या 11 मोसमांमध्ये कोण आणि कितीवेळा या चषकाचे मानकरी ठरले ते जाणून घेऊया.

राजस्थान (2008) : आयपीएलचा पहिला मोसम हा राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. राजस्थानच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर 3 विकेट्स राखून विजय मिळवला होता. यावेळी चेन्नईने राजस्थानसमोर 164 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जे गाठत राजस्थानने चेन्नईला पराभूत केलं होतं.  मात्र, त्यानंतर राजस्थान आतापर्यंत पुन्हा कधीही जिंकू शकलेला नाही.

डेक्कन चार्जर (2009) : आयपीएलचा दुसरा मोसम हा 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. या मोसमात डेक्कन चार्जर हा संघ विजयी ठरला होता. शेवटच्या सामन्यात डेक्कन चार्जरने रॉयल चॅलेंर्जस बंगळूरुसमोर 20 षटकात 143 धावांचं लक्ष ठेवलं होतं. यावेळी सामन्यात डेक्कन चार्जरने रॉयल चॅलेंर्जस बंगळूरुला 6 धावांनी पराभूत केलं होतं.

चेन्नई (2010) : आयपीएच्या तिसऱ्या मोसमात कॅप्टन कुल धोनीचा चेन्नई सुपर किंग्स हा संघ विजयी ठरला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. चेन्नई सुपर किंग्सने  मुंबईसमोर 168 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र, मुंबई केवळ 146 धावा काढू शकली.

चेन्नई (2011) : आयपीएच्या चौथ्या मोसमातही चेन्नई सुपर किंग्सने उत्कृष्ट कामगिरी करत हे चषक जिंकले. चेन्नईने शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंर्जस बंगळूरुला पराभूत केलं होतं. चेन्नईने 20 षटकात 205 धावा केल्या होत्या, तर रॉयल चॅलेंर्जस बंगळूरु केवळ 147 धावा काढण्यात यशस्वी ठरला होता.

कोलकाता (2012) : अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने 2012 चा आयपीएलचा चषक आपल्या नावे केला. या मोसमाच्या शेवटच्या सामन्यात कोलकाताने दोनवेळा हा किताब जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सला 5 विकेट्स राखून पराभूत केलं होतं.

मुंबई (2013) : आयपीएलचा सहावा मोसम हा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघासाठी खूप महत्त्वाचा ठरला. रोहितच्या मार्गदर्शनात मुंबईच्या संघाने आयपीएलचा सहावा मोसम आपल्या नावे केला. यावेळीही मुंबईसमोर चेन्नईचं आव्हान होतं. मात्र, मुंबईने चेन्नईला 23 धावांनी पराभूत करत आयपीएलचा सहावा मोसम जिंकण्याचा मान मिळवला.

कोलकाता (2014) : आयपीएलच्या सातव्या मोसमाचा मानकरी पुन्हा एकदा शाहरुख खानचा संघ ठरला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्यांदा आयपीएलचा किताब आपल्या नावे केला. यावेळी कोलकाताने किंग्स इलेव्हन पंजाबला पराभूत केलं होतं. पंजाबने 20 षटकात 199 धावा काढल्या होत्या. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यात कोलकाताने शेवटच्या चेंडूत सामना जिंकला होता.

मुंबई (2015) : आयपीएलच्या आठव्या मोसमात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा हा किताब मिळवला. यावेळीही शेवटच्या सामन्यात मुंबईसमोर चेन्नईचं आव्हान होतं. या सामन्यात मुंबईने चेन्नईला 41 धावांनी पराभूत केलं होतं.

हैद्राबाद (2016) : आयपीएलच्या नवव्या मोसमात सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला पराभूत केलं होतं. शेवटच्या सामन्यात हैद्राबादने बंगळूरुवर 8 धावांनी विजय मिळवला होता.

मुंबई (2017) :  आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई आणि पुणेमध्ये अंतिम सामना रंगला. यावेळी मुंबईने पुणेला पराभूत केलं हा किताब आपल्या नावे केला. त्यासोबतच मुंबई इंडियन्स आयपीएलचे सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला.

चेन्नई (2018) : आयपीएलचा गेल्या वर्षीचा अकरावा मोसम हा चेन्नई सुपर किंग्सने जिंकला. चेन्नईने अंतिम सामन्यात मुंबईवर 8 विकेट्स राखून विजय मिळवला. त्यासोबतच चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल जिंकणारा दुसरा संघ बनला. याआधी मुंबईने तीनवेळा हा किताब जिंकला होता.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आयपीएलचे तीन-तीन मोसम जिंकले आहेत. त्यामुळे यंदाच्या मोसमात कोण हा किताब आपल्या नावे करणार याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. यंदाचा मोसम जिंकणारा संघ सर्वाधीक आयपीएलचे मोसम जिंकलेला संघ ठरणार आहे. त्यामुळे मुंबई जिंकणार की चेन्नई हे बघणं खरंच रोमांचक असणार आहे.

संबंधित बातम्या :

प्रत्येक सामन्यात चेन्नईची धाकधूक वाढवणारे मुंबईचे पाच खेळाडू

मुंबई विरुद्ध चेन्नई, यंदाचा IPL विजेता कोण ?

आयपीएल विजेत्या संघासोबतच या खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पडणार

चेन्नई 10 पैकी 8 वेळा फायनलमध्ये, कुणाचं पारडं जड?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *