Tiger Woods : जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात

जगप्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्सचा (Tiger Woods accident) भीषण अपघात झाला. भरधाव कार अपघातात टायगर वूड्स गंभीर जखमी झाला.

Tiger Woods : जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात
Photo credit : Tiger woods twitter

लॉस एंजिल्स : जगप्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्सचा (Tiger Woods accident) भीषण अपघात झाला. भरधाव कार अपघातात टायगर वूड्स गंभीर जखमी झाला. लॉस एंजिल्सजवळ मंगळवारी ही दुर्घटना घडली. सध्या टायगर वूड्सला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 48 वर्षीय वूड्सच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. भीषण अपघातातून तो बालंबाल बचावला. ( Tiger Woods hospitalized with injuries after a single-car accident Tuesday in California)

मिळालेल्या माहितीनुसार, गोल्फर टायगर वूड्स स्वत: कार चालवत होता. वूड्स हा हॉथोर्न बुलेवार्डकडे वेगाने जात होता. त्यावेळी गाडीवर नियंत्रण सुटल्याने, कार थेट डिव्हायडरला धडकली. वूड्सला जेव्हा गाडीतून बाहेर काढलं, त्यावेळी तो रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या शरिरावर अनेक जखमा झाल्या होत्या.

जगातील सर्वोत्तम गोल्फर म्हणून टायगर वूड्सचं नाव आहे. वूड्सने 15 सर्वोत्तम गोल्फ चॅम्पियनशीप जिंकल्या आहेत. तब्बल 683 आठवडे त्याने नंबर वन रँकिंगवर दबदबा ठेवला. एक खेळाडू म्हणून त्याचं नाव आहेच, पण जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणूनही वूड्सचं नाव आहे

दुखापतीमुळे आता वूड्स आगामी मास्टर्स स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हा किताब वूड्सने 2019 मध्ये जिंकला होता.

संबंधित बातम्या

शेतकऱ्याच्या मुलीचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न ! कष्टकरी बापाने शेताचं रुपांतर मैदानात केलं 

IND vs ENG 3rd Test Playing XI : बुमराह-पंड्या पुनरागमनासाठी सज्ज, Pink Ball test साठी संघात बदल होणार? 

( Tiger Woods hospitalized with injuries after a single-car accident Tuesday in California)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI