AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 3rd Test | उमेश यादवचं शतक! भारतात अशी कामगिरी करणार 13 वा खेळाडू

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची स्थिती एकदम नाजूक आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलिया जिंकेल अशी स्थिती आहे. कारण भारताने विजयासाठी अवघ्या 75 धावांचं आव्हान दिलं आहे.

IND vs AUS 3rd Test | उमेश यादवचं शतक! भारतात अशी कामगिरी करणार 13 वा खेळाडू
IND vs AUS | उमेश यादवचं शतक! भारतात अशी कामगिरी करणार 13 वा खेळाडूImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 02, 2023 | 5:09 PM
Share

मुंबई : तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं जबरदस्त कमबॅक करत भारताला दणका दिला आहे. पहिल्या डावात 109 धावांवर भारताला रोखलं आणि 88 धावांची आघाडी घेतली. लीडमुळे दुसऱ्या डावात भारताची स्थिती अशी करून ठेवली की 100 धावाही विजयासाठी देता आल्या नाहीत. अवघ्या 75 धावा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत 142 चेंडूत 59 धावांची खेळी केली. मात्र असं असताना वेगवान गोलंदाज उमेश यादवनं एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतात 100 गडी बाद करण्याचा मान मिळवला. अशी कामगिरी करणारा उमेश यादव 13 वा गोलंदाज आहे. तिसऱ्या कसोटीत 3 गडी बाद करत भारतात 100 गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

उमेश यादवला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजच्या जागी संधी मिळाली आहे. उमेशला संधी मिळताच पहिल्या डावात त्याने ऑस्ट्रेलियाचे 3 गडी बाद केले. उमेशनं फक्त 5 षटकं टाकत 12 धावा देऊन 3 गडी टिपले. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिशेल स्टार्कला त्रिफळाचीत करत उमेशने भारतात 100 गडी बाद केले आहेत. यासह उमेश यादव माजी क्रिकेटपटू कपिल देव, जवागल श्रीनाथ, जाहीर खान आणि इशांत शर्मा यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. भारतात सर्वाधिक 219 विकेट घेत कपिल देव आघाडीवर आहे.

भारतात कसोटीत 100 विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज

  • कपिल देव- 219 विकेट्स
  • जवागल श्रीनाथ- 108 विकेट्स
  • जहीर खान- 104 विकेट्स
  • इशांत शर्मा- 104 विकेट्स
  • उमेश यादव-101 विकेट्स

भारतात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

  • अनिल कुंबळे – 350 विकेट्स
  • रविचंद्रन अश्विन- 329 विकेट्स
  • हरभजन सिंग – 265 विकेट्स
  • कपिल देव – 219 विकेट्स
  • रविंद्र जडेजा – 193 विकेट्स
  • भागवथ चंद्रशेखर- 142 विकेट्स
  • बिशनसिंह बेदी- 137 विकेट्स
  • जवागल श्रीनाथ- 108 विकेट्स
  • जहीर खान- 104 विकेट्स
  • इशांत शर्मा- 104 विकेट्स
  • विनू मनकड – 103 विकेट्स
  • प्रग्यान ओझा- 101 विकेट्स
  • उमेश यादव- 101 विकेट्स

भारताने तिसऱ्या डावात अवघ्या 75 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाला दिलं आहे. हा सामना गमवल्यानंतर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कठीण होणार आहे. त्यामुळे आता चौथा कसोटी सामना भारतासाठी करो या मरो असाच ठरणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.