प्रीती झिंटाला मिठी मारल्यानंतर वैभवच्या त्या कृत्याची चर्चा, धोनी समोर येताच… व्हिडीओ व्हायरल
IPL मध्ये वैभव सूर्यवंशीचा धोनीला पाया पडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. प्रीती झिंटासोबतचा फेक फोटो वादानंतर हा नवीन वाद निर्माण झाला आहे. वैभवने धोनीची भेट घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल व्यक्त केलेले विचारही प्रेरणादायी आहेत. धोनी त्यांच्यासाठी आदर्श असल्याचे वैभवने म्हटले आहे. हा व्हिडिओ आणि त्यांचे विचार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

आयपीएलमधील सेन्सेशन ठरलेला वैभव सूर्यवंशी आणि प्रीती झिंटा या दोघांचा एक फोटो व्हायरल झाल्यावर बरीच चर्चा सुरू झाली होती. मात्र तो फेक असल्याचे समोर आले होते. आता त्याच वैभव सूर्यवंशीचा आणखी एक फोटो समोर आला असून चेन्नईचा कर्णधार एम.एस धोनी समोर आल्यानतंर त्याने जे कृत्य केलं त्याचीही सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोनीची भेट घेतल्यानंतर वैभव हा धोनीबद्दल जे बोलला ते अगदी ऐकण्यासारखं आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमात 17 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. त्यानंतर प्रीती झिंटा आणि वैभवची भेट झाली होती. दोघांनी हस्तांदोलन केलं पण काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणा करत वैभव आणि प्रीतीने एकमेकांना मीठी मारल्याचा फोटो व्हायरल केला होता. त्यावरून बराच गदारोळ झाला, प्रीतीनेही नाराजी व्यक्त करत सोशल मीडिया प्लटफॉर्मवरुन पोस्ट करत संताप व्यक्त केला.
मात्र आता या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर वैभने काल, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध्या सामन्यानंतर धोनी समोर आल्यावरही एक कृत्य केलं, ज्याचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या या हंगामातील शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर शानदार विजय मिळवला. 14 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने 57 धावांची धमाकेदार खेळी केली. हा सामना संपल्यानंतर वैभव हा चेन्नईचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी याच्या पाया पडला. त्याच्या या कृतीचे खूप कौतुक होत आहे. मात्र त्यानंतर अवघ्या 30 सेकंदांतच वैभवने धोनीबद्दल जे उद्गार काढले, त्यावरून तो त्याच्यासाठी किती महत्वाचा आहे तेही दिसून आलं.
धोनीच्या पाया पडला वैभव
राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामना संपल्यानंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करू लागले, तेव्हा धोनी समोर आल्यावर इतर खेळाडूंनी जे केले त्याची पुनरावृत्ती वैभवने केली नाही. तो थेट धोनीच्या पाया पडला आणि त्याचे आशीर्वाद घेतली. वैभव सूर्यवंशी हा धोनीच्या पायांना स्पर्श करतानाचा तो व्हिडिओ ज्यांनी पाहिला, ते त्याचे चाहते झाले. प्रत्येक जण त्याच्या संस्कारांचे कौतुक करू लागला.
धोनीबद्दल काय म्हणाला वैभव ?
मात्र, पायांना स्पर्श करण्याचा आणि नमस्कार करण्याचा व्हिडिओ ही नाण्याची फक्त एक बाजू आहे. दुसरीकडे, वैभवने, धोनी असण्याचा अर्थ काय आहे ते स्पष्ट केल. सामन्यातील त्याचा 30 सेकंदांपेक्षा कमी कालावधीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो धोनीबद्दलच्या त्याच्या विचारांची जगाला ओळख करून देत आहे. धोनी असण्याचा अर्थ काय असा सवाल विचारल्यावर वैभवने थेट उत्तर दिलं.
वैभव म्हणाला- धोनी आमच्या बिहारमधील आहे, त्यामुळे त्याचा आमच्यावर खूप प्रभाव आहे. तो फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. त्याने देशासाठी जे केले आहे ते इतर कोणीही केले नाही. तो एक लेजंड आहे आणि मी त्याच्याबद्दल यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही, तेवढे शब्दच माझ्याकडे नाहीत, अशा शब्दांचत वैभवने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
वैभव सूर्यवंशीची समज आणि धोनीबद्दलचे त्याचे विचार ऐकल्यावर सर्वांनीच त्याचे कौतुक केलं आहे.