मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने क्रिकेट विश्वातील अनेक बड्या खेळाडूंना टक्कर दिली, अनेक किताब आपल्या नावे केले. आपल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघाचा कर्णधार बनला. ही जबाबदारी त्याने मोठ्या शिताफीने पार पाडली. मात्र धोनीसारखा तो ‘कुल कॅप्टन’ होऊ शकला नाही. कोहली हा किती आक्रमक खेळाडू आहे हे तर आपण तो खेळत असताना बघतोच, पण मैदानाबाहेरही तो तितकाच आक्रमक असल्याचं दिसून आलं आहे.