अजिंक्य रहाणे तळपला, विराट कोहलीचे कर्णधारपद धोक्यात?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेने केलेल्या नेतृत्वामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वावर गंडांतर येणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे. (Virat Kohli Ajinkya Rahane captainship)

अजिंक्य रहाणे तळपला, विराट कोहलीचे कर्णधारपद धोक्यात?
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 8:04 AM

मुंबई : ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत जाऊन लोळवण्याचा पराक्रम टीम इंडियाने केला. या यशामध्ये भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) मोठा वाटा आहे. मात्र, अजिंक्यच्या  अद्वितीय नेतृत्वाखाली भारताने मिळवलेल्या या दमदार यशानंतर आता अनेक चर्चांना तोडं फुटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेने केलेल्या नेतृत्वामुळे विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वावर गंडांतर येणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे. (Virat Kohli and Ajinkya Rahane captaincy issue, no threat to captainship of Virat Kohli)

कोहलीच्या कर्णधारला कोणताही धोका नाही

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला दमदार विजय मिळाल्यामुळे आता अजिंक्यकडेच कसोटी सामन्यांचे कर्णधारपद सोपवावे अशी मागणी केली जात आहे. दमदार नेतृत्वशैली आणि टीमला सोबत घेऊन जाण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे ही मागणी होत आहे. याच मागणीमुळे भारतीय संघातील आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहलीचे कर्णधारपद धोक्यात येण्याची चर्चा आहे. मात्र, ही फक्त चर्चा असून सध्यातरी कोहलीच्या कर्णधारपदालला कोणताही धोका नसल्याचे म्हटले जात आहे.

मात्र, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशामुळे आगामी काळात ड्रेसिंग रुममधील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. तसेच, गाबा येथील यशानंतर भारतीय संघातील सीनियर खेळाडूंचा मान-सन्मान नक्की वाढणार आहे. सध्या रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे ड्रेसिंग रुममधील वजन वाढले आहे. त्यांच्या मताला यानंतर संघात विशेष स्थान असेल. यानंतर संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे असले तरी संघातील वरिष्ट खेळांडूंना नेतृत्वाच्या बाबतीत सारखीच प्रतिष्ठा असेल.

या गोष्टींबद्दल विचार केलेला नाही : रहाणे

एका महिन्याचा अवकाशानंतर विराट कोहलीचे संघात पुनरागमन होणार आहे. त्यानंतर संघाचे कर्णधारपद विराटकडे पन्हा सोपवले जाईल. इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सीरिजमध्ये विराट आपल्याला पुन्हा मैदानावर दिसेल. कोहली परतल्यानंतर ‘संघाचा उपकर्णधार म्हणून मैदानात वावरताना कसे वाटेल?’, असा प्रश्न अजिंक्यला विचारण्यात आला. त्यावर बोलताना “या गोष्टींविषयी मला विचार करायचा नाही. सध्या आम्ही जिंकलो आहोत. या यशाचा मला अनंद लुटायचा आहे. त्यांनतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सीरिजविषयी विचार करु,” असं थेट उत्तर अजिंक्यने दिलेलं आहे. त्याच्या या उत्तरावरुन विराटच्या आगमनानंतर संघात काही बदल होणार असले तरी, भारतीय संघाचा उत्साह कायम राहणार असून कोहलीच्या कर्णधारपदाला सध्यातरी कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

स्टम्पच्या मागे उभा राहून रिषभ पंत नेमकं काय गात होता; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘तुला’ परमयोद्धा म्हणून ओळखलं जाईल, रवी शास्त्रींचं ड्रेसिंग रुममध्ये तीन मिनिटांचं भाषण

(Virat Kohli and Ajinkya Rahane captaincy issue, no threat to captainship of Virat Kohli)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.