AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : अखेर निर्णय झालाच, विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा, निवृत्तीचा निर्णय जाहीर

14 वर्षांच्या कारकिर्दीनंतर विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटला अलविदा केलं आहे. रोहित शर्मापाठोपाठ आता विराटनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

Virat Kohli : अखेर निर्णय झालाच, विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा, निवृत्तीचा निर्णय जाहीर
विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदाImage Credit source: Instagram
Updated on: May 12, 2025 | 4:33 PM
Share

भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटून विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यातच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते, BCCIशी त्याचं बोलणंही झालं होतं. मात्र अखेर आज या निर्णयावर त्याने शिक्कामोर्तब करत हा निर्णय जाहीर केला आहे. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांचे हृदयभंग झालाय हे निश्चितच !

काही दिवसांपूर्वीच विराटने कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीबाबत संकेत दिले होते. आज या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने त्याचे चाहते आता त्याला पुन्हा कधीच कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळताना पाहू शकणार नाहीत.

सोशल मीडियावर पोस्ट लिहीत निर्णय केला जाहीर 

14 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या कारकिर्दीला अखेर जड अंत:करणाने अलविदा करत असल्याचे सांगत विराटने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

ते स्वप्न अखेर अधुरंच…

विराटने इन्स्टावरील पोस्टमध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केल्या. कसोटी क्रिकेटमधील हा प्रवास मी हसतमुखाने पाहीन असं त्याने लिहीलं असलं तरी आयुष्यातील एक स्वप्न अधुरं राहिल्याचं दु:ख कायम त्याच्या मनात सलत राहील. विराटचं ते स्वप्न कसोटीतील 10 हजार धावांशी निगडीत आहे. ते पूर्ण न करताच त्याने कसोटी क्रिकेटच्या या फॉरमॅटला अलविदा केलंय.

विराटचं टेस्ट करिअर

विराट कोहलीने त्याच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत 123 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. पण विराट त्याच्या 10 हजार कसोटी धावांच्या स्वप्नापासून अवघा 770 धावा दूर होता. विराट कोहलीची कसोटी शतकं आणि अर्धशतकांची संख्या जवळजवळ समान आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकं झळकावली आहेत.

विराटचं एकूण क्रिकेट करिअर

123 टेस्ट, 210 इनिंग्स, 9230 रन, 46.85 ॲव्हरजे, 30 शतक, 31 अर्धशतक 302 वनडे, 290 इनिंग्स, 14181 रन, 57.88 ॲव्हरेज, 51 शतक, 74 अर्धशतक, 5 विकेट 125 टी20, 117 इनिंग्स, 4188 रन, 48.69 ॲव्हरेज, 1 शतक, 38 अर्धशतक, 4 विकेट

18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट
18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट.
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.