विराट कोहलीने वापरलेली आलिशान ऑडी बे’कार’ अवस्थेत

विराटने ऑडी विकलेला सागर ठक्कर घोटाळ्यात अडकल्यामुळे पोलिसांना कारवर जप्तीची कारवाई करावी लागली.

विराट कोहलीने वापरलेली आलिशान ऑडी बे'कार' अवस्थेत
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 8:02 AM

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कोणे एके काळी वापरलेली ऑडी कार सध्या पोलीस स्टेशनबाहेर धूळ खात पडली आहे. आश्चर्याचा धक्का देणारी ही बातमी शंभर टक्के खरी आहे. विराटने गाडी विकल्यानंतर तिचा नवा मालक सागर ठक्करने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ऑडीला भोगावी लागत आहे. (Virat Kohli first Audi car is lying in the police station)

फक्त भारतातच नाही, तर विराट कोहली हा जगाच्या पाठीवर सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. टीम इंडियाचं यशस्वी नेतृत्व केल्यामुळे विराटच्या घरी लक्ष्मी पाणी भरते, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विराटला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे तो डझनभर ब्रँड्सचा पोस्टरबॉय झाला आहे. फक्त क्रिकेटच्या मैदानावरच नाही, तर तरुणांना आकर्षित करणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याला ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे.

विराटला महागड्या गाड्यांचा शौक

विराट कोहलीकडे आलिशान गाड्यांचा ताफा असल्यास आश्चर्य वाटणार नाही. लक्झरी कार चालवण्याचं विराटला वेड आहे. जगातील महागड्या गाड्या वापरण्याचा त्याला शौक आहे. गेल्या काही काळापासून तो ऑडी इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ऑडी इंडियाच्या प्रत्येक कार लाँचवेळी विराट नव्या गाड्यांवर हात साफ करुन घेतो.

विराटची गाडी पोलिस स्टेशनात कशी?

विराट जर सातत्याने नव्या गाड्या घेत असेल, तर जुन्या गाड्यांचं काय होतं? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमी सतावत असतो. विराटच्या ताफ्यात असलेल्या एका गाडीविषयी नक्कीच खात्रीने सांगता येईल. ऑडी कंपनीची ही आलिशान कार सध्या महाराष्ट्रातील एका पोलीस स्टेशनबाहेर उभी आहे, तीही धूळ खात… (Virat Kohli first Audi car is lying in the police station)

आता विराट कोहलीच्या गाडीवर जप्तीची कारवाई झाली का, असा अंदाज कोणीही बांधेल. मात्र त्यात तथ्य नाही. विराट कोणत्याही गुन्ह्यात अडकलेला नव्हता. ऑडी इंडियाने आर8 (R8) ही नवी कार लाँच केली, तेव्हा विराटने आधीचे मॉडेल विकायला काढले. विराटकडे असलेली ती ऑडी 2012 चे मॉडेल होते, तर विराटची पहिलीच ऑडी कार होती.

कोण आहे सागर ठक्कर?

विराटने 2016 मध्ये ब्रोकरच्या माध्यमातून सागर ठक्कर नावाच्या व्यक्तीला ही कार विकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार सागरचे हात एका घोटाळ्यात अडकले होते. त्यामुळे पोलिसांना त्याच्या कारवर जप्तीची कारवाई करावी लागली. खरं तर आपल्याला गर्लफ्रेण्डला गिफ्ट देण्यासाठी सागरने तेव्हा कार खरेदी केली होती. मात्र एका बड्या घोटाळ्यात अडकल्यानंतर मुंबई पोलिसांनी सागरला बेड्या ठोकल्या.

सागर ठक्कर कॉल सेंटर घोटाळ्यात अडकला होता. सागरने परागंदा झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याच्या मालमत्तेवर जप्ती आणली. यामध्ये त्याच्या ऑडी R8 चाही समावेश होता. सुदैवाने विराट कोहलीने कार विकताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्यामुळे तो अडचणीत आला नाही. अडीच कोटींना विकत घेतलेली ही कार अवघ्या दोन महिन्यात जप्त झाली. ती ऑडी 2016 पासून मुंबई पोलीस ग्राऊण्डवर पडून आहे.

संबंधित बातम्या :

विराट दशकातील प्रभावशाली आणि महान खेळाडू, सुनील गावसकर यांच्याकडून कोहलीचं कौतुक

विराट कोहलीची ऑस्ट्रेलियात कमाल, धोनी-गांगुलीला देखील असा रेकॉर्ड करणं जमलं नाही!

(Virat Kohli first Audi car is lying in the police station)

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.