AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat kohli | विराट कोहलीची ऑस्ट्रेलियात कमाल, धोनी-गांगुलीला देखील असा रेकॉर्ड करणं जमलं नाही!

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Ind Vs Aus 2020) टी-ट्वेन्टी मालिका 2-1 अशी जिंकली. या मालिकाविजयासह कर्णधार विराटने ऐतिहासिक कामगिरी केली.

Virat kohli | विराट कोहलीची ऑस्ट्रेलियात कमाल, धोनी-गांगुलीला देखील असा रेकॉर्ड करणं जमलं नाही!
| Updated on: Dec 08, 2020 | 7:19 PM
Share

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Ind Vs Aus 2020) टी-ट्वेन्टी मालिका 2-1 अशी जिंकली. या मालिका विजयासह कर्णधार विराटने ऐतिहासिक कामगिरी केली. विराट ऑस्ट्रेलियाविरोधात तीनही फॉरमॅटमध्ये सीरिज जिंकवून देणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. (Virat kohli First indian Captain To Win india All three Format Series Against Australia)

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 च्या फरकाने पराभव केला होता. टीम इंडियाने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियावर एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. मात्र या वेळेस टीम इंडियाला टी 20 सीरिज जिंकण्यास अपयश आले होते. 3 सामन्यांची टी 20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. तर उर्वरित 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर या दौऱ्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-ट्वेन्टी मालिका 2-1 अशी जिंकली

विराट दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात टी 20 मालिका जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीनेही या सर्व संघांविरोधात टी 20 मालिकेत नेतृत्व केलं. मात्र धोनीला इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधातील टी 20 मालिका जिंकण्यास अपयश आले होते.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय (तिन्ही फॉरमॅट)

2018/2019- 4 कसोटी सामन्यांची मालिका- (भारताने 2-1 ने मालिका जिंकली ) 2018/2019- 3 सामन्यांची नवडे मालिका- (भारताने 2-1 ने मालिका जिंकली) 2020- 3 सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका- भारताने (2-1 ने मालिका जिंकली)

एकीकडे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे आशियामधले कसोटी क्रिकेट खेळणारे पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकली नाही.

(Virat kohli First indian Captain To Win india All three Format Series Against Australia)

संबंधित बातम्या

India vs Australia 2020 3rd T20 Live Updates : अखेरचा टी-ट्वेन्टी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड, भारताचा 12 रन्सने पराभव

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.