AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : 18 वर्ष वाट पहायला लावलीस मित्रा… IPL चँपियन बनल्यावर विराटची पहिली पोस्ट

विराट कोहलीने दीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. गेल्या 17 हंगामात तो अनेकदा ट्रॉफीच्या जवळ पोहोचला होता, पण तो जिंकू शकला नाही. मात्र यावेळी आरसीबीची आणि विराटची प्रतीक्षा संपली. IPL चँपियन झाल्यावर विराटने पहिली पोस्ट केली आहे, जी काही क्षणातच व्हायरल झाली.

Virat Kohli : 18 वर्ष वाट पहायला लावलीस मित्रा... IPL चँपियन बनल्यावर विराटची पहिली पोस्ट
आयपीएल फायनल जिंकल्यावर विराट कोहलीची सोशल मीडियावर पहिली पोस्ट
| Updated on: Jun 04, 2025 | 9:58 AM
Share

आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये पायनल जिंकत ट्रॉफीवर नाव कोरणं हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी स्वप्नपूर्तीसारखंच होतं. 18 वर्ष वाट पाहिल्यावर अखेर आरसीबी आणि विराटचं स्वप्न साकार झालं आहे. कालच्या फायनलमध्ये आरसीबीने पंजाबचा 6 धावांनी पराभव केला. यामुळे आरसीबीच्या खेळाडूंसह साखो चाहतेही प्रचंड खुस आहेत. विराट तर खूपच भावूक झाला. भर मैदानातच त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. या ऐतिहासिक विजयानंतर, आरसीबीचा सर्वात वरिष्ठ खेळाडू असलेल्या विराटने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली असून भावूक मेसेज लिहीला आहे. 4 जून 20205 रोजी सकाळी 8 वाजता शेअर केलेल्या या पोस्टमध्ये विराटने केवळ आपला आनंद व्यक्त केला नाही तर चाहते आणि या दीर्घ प्रवासाच्या आठवणीही ताज्या केल्या. पोस्टमधील त्याचे भावनिक शब्द आणि ट्रॉफीसहचे त्याचे फोटो यांनी चाहत्यांची मने जिंकली. अवघ्या काही मिनिटांतच त्याची पोस्ट व्हायरल झाली असून लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

कालच्या फायनलमध्ये पंजाबचा 6 धावांनी पराभव झाला आणि विराटसह आरसीबीचा संपूर्ण संघ, सपोर्ट स्टाफ, कोच, आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. खेळांडूनी ट्रॉफी उचलली तेव्हा संपूर्ण मैदानत जयघोषाने दुमदूमून गेलं. ख्रिस गेल, बी डि व्हिलियर्स यांच्यासह आरसीबीचे सर्व आजी माजी खेळाडू या विजयाचा जल्लोष करत होते.

विराटने काय लिहीलंय ?

या विजयानंतर विराट कोहलीने भावूक झाला होता, मैदानातच तो चक्क रडला. कालच्या विजयानंतर त्याने आज सकाळी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्याने मैदानावरील ट्रॉफी उचलतानाचे आणि ट्रॉफीबरोबर शूट केलेले काही फोटोही टाकले आहेत. तसेच त्याने एक भावूक पोस्टही लिहीली आहे. ” या संघाने स्वप्न साकार केले, हा सीझन मी कधीही विसरणार नाही. गेल्या अडीच महिन्यांतील प्रवासाचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला आहे. हे (विजय , ट्रॉफी) आरसीबी चाहत्यांसाठी आहे ज्यांनी वाईट काळातही आमची साथ कधीच सोडली नाही. ही सोडले नाही. ही ट्रॉफी इतक्या वर्षांचा हार्टब्रेक आणि निराशेसाठी आहे. संघ म्हणून खेळताना मैदानावर केलेल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी आहे.” असं विराटने लिहीलं.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

मला तू 18 वर्षे वाट पाहायला लावलीस…

“आयपीएल ट्रॉफीबद्दल मी काय बोलू…, मित्रा, ही ट्रॉफी उचलून आनंद साजरा करण्यासाठी मला तू 18 वर्षं वाट पाहायला लावलीस. पण या प्रतिक्षेनंतरचा आजचा आनंद अनोखा आहे”, असं म्हणत विराट कोहलीने या कॅप्शनला शेवटी हार्ट, ट्रॉफीची इमोजी टाकली आहे आणि शेवटी royalchallengers.bengaluru लाही त्याने टॅग केलंय.

आयपीएलमध्ये विराटची दमदार फलंदाजी

2025 च्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. संपूर्ण हंगामात त्याने 15 सामन्यांमध्ये 657 धावा केल्या, ज्यात 8 अर्धशतकांचा समावेश होता. कोहलीची सरासरी 54.75 होती आणि त्याने 144.71 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.