Virat Kohli : असदुद्दीन ओवेसी, विराट कोहलीबाबत जे म्हणाले, ते तुम्ही सुद्धा ऐकलं पाहिजे; कौतुकाचा असा जमके केला वर्षाव
Asaduddin Owaisi on Virat Kohli : विराट कोहली याने नुकताची कसोटी मालिकेतून निवृत्ती स्वीकारली. त्यावरून क्रिकेट जगतात नवनवीन दावे-प्रतिदावे सुरूच आहे. या सर्व घडामोडींवर एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मनमोकळ केलं आहे.

भारताचा दमदार आणि तडाखेबंद खेळाडू विराट कोहली याने कसोटीतून निवृ्त्ती स्वीकारल्याने किक्रेट जगतामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यावरून एकच वादळ उठलं आणि ते अजूनही शमलेलं नाही. या निवृत्तीचे पडद्यामागील सूत्रधार कोण यावरून चर्चा आणि आरोप सातत्याने सुरू आहे. असे असतानाच, एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पण विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अनेकांना हे माहिती नाही की, ओवेसी यांनी भारताचे दिग्गज गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांच्यासोबत मैदान गाजवले आहे. तर कोहली विषयीच्या भावना ओवेसी यांनी व्यक्त केल्या आहेत.
विराट कोहली जबरदस्त प्लेअर




विराट कोहलीने नुकतेच कसोटी क्रिकेटला रामराम केला. तर त्यापूर्वी टी-20 मधून त्याने निवृत्ती जाहीर केलेली होती. आता तो केवळ एक दिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसून येईल. वृत्तसंस्था PTI ला असदुद्दीन ओवेसी यांनी एक मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विराट कोहलीची जमके तारीफ केली.
“अरे, तो जबरदस्त प्लेअर आहे. त्याच्या कवर ड्राईव्ह शॉटला आता आपण मुकणार आहोत. त्याने ज्या प्रमाणे गोलंदाजांच्या डोक्यावरून चेंडू टोलवला. तो अविस्मरणीय शॉट आहे. तो एकदम जबरदस्त खेळाडू आहे. एकदम ग्रेट प्लेअर आहे.” असा कौतुकाचा पूल ओवेसी यांनी बांधला. भारतात टॅलेंटची कमतरता नाही, विराट सारखे अजून खेळाडू जन्म घेतील.
विराट कोहली को लेकर बैरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहब का बयान 👑🏏 pic.twitter.com/IFCfDNZZnN
— Mohammed Naseeruddin (@naseerCorpGhmc) May 19, 2025
मोहम्मद अझहरुद्दीन यांच्याशी तुलना नाही
असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. आपण जर क्रिकेट खेळत राहिलो असतो तर मोठ्या सामन्यात खेळलो असतो. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, मोहम्मद अझहरुद्दीन सारख्या हैदराबादी खेळाडूंसारखे आपले पण मोठे नाव झाले असते, असे ओवेसी म्हणाले. पण मोहम्मद अझहरुद्दीन सारख्या महान खेळाडूसोबत आपली तुलना होऊ शकत नाही. त्यावेळी आपण एक सर्वसाधारण गोलंदाज होतो, असे ओवेसी म्हणाले.
ओवेसी यांनी दक्षिण भागातील विद्यापीठस्तरावर 25 वयोगटाखालील क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता. ते 1994 मध्ये विजय ट्रॉफीत सुध्दा खेळले. विद्यापीठातंर्गत विजय ट्रॉफीला महत्त्व आहे. पण पुढे ओवेसी राजकारणाच्या पिचवर खेळले आणि हे मैदान त्यांनी गाजवले.