AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : दोन सेंच्युरी, एक अर्धशतकानंतर विराट भक्तीमध्ये लीन, या मंदिरात पोहोचला दर्शनासाठी

Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये विराट कोहली टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरला. त्याने या सीरीजमध्ये आपल्या बॅटचा तडाखा दाखवून दिला. यात दोन सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी आहे. सीरीज संपल्यानंतर विराट लगेच मंदिरात दर्शनासाठी गेला.

Virat Kohli :   दोन सेंच्युरी, एक अर्धशतकानंतर विराट भक्तीमध्ये लीन, या मंदिरात पोहोचला दर्शनासाठी
Virat Kohli
| Updated on: Dec 07, 2025 | 4:59 PM
Share

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची मंदिरांवर श्रद्धा आहे. अनेकदा तो पत्नी अनुष्का शर्मासोबत भक्तीमध्ये लीन दिसतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये दमदार प्रदर्शनानंतर असच पहायला मिळालं. सीरीजमध्ये भारताच्या शानदार विजयानंतर विराट कोहली विशाखापट्टणमच्या सिंहाचलम मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. इथे येऊन त्याने भगवान विष्णुंच दर्शन घेतलं. ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

ही सीरीज कोहलीसाठी खूप चांगली ठरली. तीन सामन्यात त्याने एकूण 302 धावा ठोकल्या. यात दोन शतकं आणि एक अर्धशतक आहे. या शानदार प्रदर्शनासाठी त्याला प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळाला. सीरीज संपल्यानंतर कोहली थेट सिंहाचलम मंदिरात दर्शनासाठी गेला. सफेद टी-शर्ट, खांद्यावर टॉवेल आणि हातात फुलांची माळ होती. मंदिरात तो आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात तो शांत चित्ताने दर्शन करताना दिसतोय. कोहली मोठ्या विजयानंतर मंदिरात दर्शनासाठी जातो. ते त्याच्या मानसिक कणखरतेच एक रहस्य मानलं जातं.

या मंदिराची लोकप्रियता आणखी वाढेल

सिंहाचलम मंदिर विशाखापट्टणममधील एक प्राचीन आणि प्रमुख धार्मिक स्थळ आहे. भगवान विष्णुंना समर्पित हे मंदिर आहे. डोंगरावरील हे मंदिर आपली वास्तुकला आणि आध्यात्मिक महत्वासाठी ओळखलं जातं. लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. आता कोहली आल्याने या मंदिराची लोकप्रियता अधिक वाढेल.

सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

विराट कोहली या सीरीजमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सीरीजच्या सुरुवातीला रांची मध्ये तो 135 धावांची इनिंग खेळला. एका फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा तो फलंदाज बनला. वनडे क्रिकेटमधील त्यांचं हे 52 वं शतक होतं. दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा त्याने शतक ठोकलं. त्याने 102 धावा केल्या. शेवटच्या सामन्यात कोहलीने 45 चेंडूत 65 धावांची वेगवान इनिंग खेळला. यात 6 फोर आणि 3 चौकार होते. या दरम्यान यशस्वी जैस्वाल सोबत त्याने 116 रन्सची पार्टनरशिप केली. त्यामुळे भारताने 271 धावांचं टार्गेट फक्त 39.5 ओव्हर्समध्ये गाठवलं. या विजयाने फक्त सीरीजच जिंकली नाही, तर कोहलीचा फॉर्म परतला. त्याला नवीन आत्मविश्वास मिळाला.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....