AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs MI : “रोहित आणि सूर्याने..”, कॅप्टन हार्दिकने हैदराबाद विरूद्धच्या सामन्यानंतर असं काय म्हटलं?

SRH vs MI IPL 2025 Hardik Pandya Post Match Presentation : मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर मात करत आयपीएल 2025 मधील सलग चौथा तर एकूण पाचव्या विजयाची नोंद केली. मुंबईने चेन्नईनंतर हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवला. रोहित शर्मा याने पुन्हा एकदा विजयात योगदान दिलं.

SRH vs MI : रोहित आणि सूर्याने.., कॅप्टन हार्दिकने हैदराबाद विरूद्धच्या सामन्यानंतर असं काय म्हटलं?
Hardik Pandya On Rohit And Suryakumar Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 24, 2025 | 2:20 AM
Share

आयपीएल इतिहासातील सर्वात पहिली यशस्वी टीम अशी मुंबई इंडियन्सची ओळख आहे. मुंबई इंडियन्सने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र मुंबईला आयपीएल 2025 मध्ये आपल्या प्रतिष्ठेला साजेशी सुरुवात करता आली नाही. मुंबईला पहिल्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. मात्र पलटणने त्यानंतर दणक्यात कमबॅक केलं. मुंबईने आता सलग चौथा विजय मिळवला आहे. मुंबईने बुधवारी 23 एप्रिलला राजीव गांधी स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने मात केली. ट्रेंट बोल्ट हा मुंबईच्या विजयाचा प्रमुख नायक ठरला. बोल्टने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

बोल्ट व्यतिरिक्त दीपक चाहर यानेही चिवट बॉलिंग केली. दीपकने 4 ओव्हरमध्ये 3 च्या इकॉनॉमीने 12 धावा देत दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 रन्सच करता आल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने मुंबईला विजयापर्यंत नेलं. रोहितने 46 चेंडूत 70 धावा केल्या. तर सूर्याने 19 बॉलमध्ये नॉट आऊट 40 रन्स केल्या. मुंबईच्या या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने काय म्हटलं? जाणून घेऊयात.

हार्दिक काय सांगितलं?

“हा सामना जिंकणं फार चांगलं आहे. आमचे खेळाडू ट्रॅकवर येत आहेत,याचा आनंद आहे. एकदा का टीममध्ये सर्वांनी चांगली कामगिरी करायला सुरुवात केली तर दबदबा तयार होईल, असं मला वाटतं. दीपक चाहर आणि टेंट्र बोल्ट या दोघांनी पाया रचला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. एकूणच हा शानदार विजय होता”, असं हार्दिकने म्हटलं आणि मुंबईच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं.

कॅप्टन्सीबाबत हार्दिकने काय सांगितलं?

नेतृत्व कधी कधी सामान्य ज्ञानावर निर्भर असते, याची मला जाणीव झाली. मला खेळ पाहणं आणि प्रतिक्रिया देणं आवडतं. तसेच आधी ठरवल्याप्रमाणे योजनेवर अवलंबून राहता कामा नये”, असं हार्दिकने नमूद केलं.

विघ्नेश पुथुरबाबत अशी प्रतिक्रिया

हार्दिकने विघ्नेश पुथुर याच्या बॉलिंगबाबतही प्रतिक्रिया दिली. “विघ्नेश एक विकेट घ्यावी, असं वाटत होतं. विघ्नेश या युवा खेळाडूने काही सामने खेळले नाहीत, त्यासाठी हे अवघड होतं हे मी समजू शकतो. तसेच मी या विजयाने समाधानी आहे”, असं हार्दिकने जाता जाता सांगितलं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.