प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेंनाच कायम ठेवण्याची इच्छा होती : VVS

विशाखापट्टणम : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांनाच कायम ठेवण्याची इच्छा होती, असं भारताचा माजी कसोटीवीर व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटलंय. 2016 मध्ये अनिल कुंबळे यांच्या नियुक्तीची शिफारस सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) केली होती. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात लक्ष्मणने हा खुलासा केला. कुंबळे प्रशिक्षक असताना भारताने चांगली कामगिरी केली. […]

प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेंनाच कायम ठेवण्याची इच्छा होती : VVS
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

विशाखापट्टणम : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांनाच कायम ठेवण्याची इच्छा होती, असं भारताचा माजी कसोटीवीर व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटलंय. 2016 मध्ये अनिल कुंबळे यांच्या नियुक्तीची शिफारस सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) केली होती. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात लक्ष्मणने हा खुलासा केला.

कुंबळे प्रशिक्षक असताना भारताने चांगली कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपर्यंत मजल मारली. पण यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील मतभेद समोर आले. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाला. ही मालिका आटोपताच कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

अनिल कुंबळेने भारताचा कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणूनही अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. कोहलीने मर्यादा पार केल्या, असं वाटत नाही. सीएसीने विचार केला, की कुंबळेच प्रशिक्षक पाहिजे. पण पद सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचं कुंबळेने सांगितलं. आमच्यावर सर्वात बेस्ट प्रशिक्षक देण्याची जबाबदारी होती. आम्ही यासाठी कुंबळेंची निवड केली, पण दुर्दैवाने विराट आणि कुंबळे यांच्यात जमलं नाही, असं लक्ष्मणने सांगितलं.

2017 मध्ये कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. ज्यामध्ये, रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मुडी आणि लालचंद राजपूत यांच्या नावाचा समावेश होता.

रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचे संबंध चांगले असल्याचं बोललं जातं. अनेक नावांवर विचार करुनही सीएसीला अखेर विराटच्या म्हणण्यानुसार रवी शास्त्रींचीच निवड करावी लागली. विराटच्या मागणीपुढे सीएसीही हतबल झाल्याचं या निमित्ताने समोर आलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें