IPL 2021 | ‘हा’ दिग्गज खेळाडू रिषभ पंतचा जबरा फॅन, म्हणाला….

IPL 2021 | 'हा' दिग्गज खेळाडू रिषभ पंतचा जबरा फॅन, म्हणाला....
टीम इंडियाचा युवा आणि आक्रमक खेळाडू रिषभ पंतने (rishabh pant) गेल्या 6 महिन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. यासाठी वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने (brian lara praised) पंतचं कौतुक केलं आहे.

टीम इंडियाचा युवा आणि आक्रमक खेळाडू रिषभ पंतने (rishabh pant) गेल्या 6 महिन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. यासाठी वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने (brian lara praised) पंतचं कौतुक केलं आहे.

sanjay patil

|

Apr 14, 2021 | 5:58 PM

मुंबई : टीम इंडियाचा युवा आणि आक्रमक खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) गेल्या काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करतोय. रिषभ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विजयी आणि निर्णायक कामगिरी करत आहेत. त्याच्या या परफॉरमन्ससाठी अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. त्यात आता आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूने पंतचं कौतुक केलं आहे. पंतने आपल्या खेळीने वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला (Brian Lara) भुरळ घातली आहे. पंतने गेल्या 6 महिन्यात आंतरराष्ट्री क्रिकेटमधील खेळात सुधारणा केली आहे, अशा शब्दात लाराने पंतचं कौतुक केलं आहे. (west indies former captain brian lara praised rishabh pant)

लारा काय म्हणाला?

“टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळली. या दरम्यान पंतने 6 महिन्यांच्या कालावधीत आपल्या कामिगिरीत सुधारणा केली आहे. तसेच पंत आता दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करतोय. तसेच एनरिक नॉर्किया, कगिसो रबाडा आणि अक्षर पटेलही खेळत नाहीयेत. त्यामुळे मला पंतकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे”, असं ब्रायन लारा म्हणाला. लारा स्टार स्पोर्ट्सच्या ‘सेलेक्ट डगआऊट’ या विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता.

“टीम पंतची मदत करेल”

दिल्ली कॅपिट्ल्सचे सहकारी पंतला साहाय्य करतील. मला वाटतं पंतला साहाय्य करु शकेल असा दिल्लीचा संघ आहे. पंतमध्ये गेल्या 4 महिन्यात खूप बदल केले आहेत. तो चांगली कामगिरी करेल, अशा आशावादही लाराने व्यक्त केला.

श्रेयसच्या दुखापतीमुळे पंतला कॅपटन्सी

श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिट्ल्सचे नेतृत्व करतो. पण श्रेयसला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली. त्याला या दुखापतीमुळे 14 व्या मोसमाला मुकावे लागले. त्यामुळे दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी पंतकडे देण्यात आली. पंतने आपल्या नेतृत्वात अनुभवी चेन्नईचा पराभव केला. श्रेयसने गेल्या पर्वात दिल्लीला अंतिम फेरीपर्यंत पोहचवले होते. यामुळे यावेळेस दिल्लीला पंतकडून विजेतेपदाची अपेक्षा असणार आहे. यामुळे पंत फलंदाजी, विकेटकीपिंगसह नेतृत्वाची जबाबदारी कशाप्रकारे सांभाळतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2021 | रिषभ पंत वीरेंद्र सेहवाग आणि बेन स्टोक्ससारखा आक्रमक, मायकल वॉर्नकडून कौतुक

Rishabh Pant | पंत म्हणजे डावखुरा सेहवाग, रिषभच्या आक्रमक फलंदाजीचा दिग्गज क्रिकेटपटू दिवाना

(west indies former captain brian lara praised rishabh pant)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें