Sachin Tendulkar-Arjun Tendulkar : सूनबाई कुठेत? साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या चरणी, सानिया..
Sachin Tendulkar Visit Lalbaugcha Raja : सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली, लेक सारा आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह मुंबईतील प्रसिद्ध लालाबगाच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले, पण त्यावेळी अर्जुनची होणारी पत्नी सानिया मात्र..

क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला सचिन तेंडुलकर याचे लाखो चाहते आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला, सचिनच्या घरी तर बाप्पाचते आगमन झाले, पण त्यानंतर त्याने सहपरिवार जाऊन मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. चेहऱ्यावर हसू, प्रसन्न मुद्रा, पारंपारिक कपडे परिधान केलेले तेंडुलकर कुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनला येताच त्यांची छबी टिपण्यासाठी सगळेच पुढे सरसावले. सचिन, अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचे बाप्पासमोरचे फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले, त्यांचे व्हिडीोही समोर आले, त्यावर अनेक लाइक्स आल्या, पण कमेंटसमध्ये अनेकांनी एकच प्रश्न विचारला तो म्हणजे, तेंडुलकर कुटुंबाची होणारी सून, अर्जुनची भावी पत्नी सानिया आहे कुठे ? सगळेजण तिलाच शोधत होते. पण तेंडुलकर कुटुंबासह यावेळी सानिया मात्र नव्हती.
सचिन तेंडुलकर दरवर्षी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करतो. यावेळीही त्याने घरी बाप्पाची पूजा केली आणि त्यानंतर त्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला भेट दिली. त्याच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लोकं येतात. सचिन आला तेव्हा चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाप्पावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी सचिन हा क्रिकेटचा देव देखील आहे. कुटुंबाची एक झलक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तो बाप्पाला नमस्कार करत होता आणि अनेक जण त्याचा फोटो काढण्यात बिझी होते.
सचिन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह येथे पोहोचला आणि सर्वांच्या नजरा त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर होत्या, त्याचा नुकताच साखरपुडा झाला. त्याची होणार पत्नी सानिया चंडोकही त्यांच्यासोबत दिसेल अशी आशा अनेकांना होती, पण डुलकर कुटुंबासह यावेळी सानिया मात्र तिथे नव्हती. ती त्यांच्यासोबत दर्शनासाठी आली नव्हती. अर्जुनने या महिन्याच्या सुरुवातीला सानिया चांडोकशी साखरपुडा केला, तीच बातमी प्रचंड चर्चेत होती. दरम्यान कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनला आलेला अर्जुन यावेळी पारंपारिक कुर्त्यामध्ये एकदम स्मार्ट दिसत होता.
#WATCH | Mumbai | Legendary former Indian cricketer Sachin Tendulkar, along with his family, offered prayers at Lalbaugcha Raja today pic.twitter.com/3oJltVfVxU
— ANI (@ANI) August 28, 2025
लेकाच्या साखरपुड्याबद्दल काय म्हणाला सचिन ?
लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या आधी सचिन, अंजली आणि अर्जुन हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी गेले होते. त्यांचे ते फोटोही वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाला होता. त्याच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा झाली नव्हती, पण बऱ्याच बातम्या आल्या होत्या. त्यानंतर खुद्द सचिननेच ही गोष्ट सांगितली. Reddit वरील “Ask Me Anything” सेशनमध्ये सचिन तेंडुलकरला एका चाहत्याने अर्जुनच्या साखरपुड्याबद्दल सवाल विचारला होता, तेव्हा सचिनने याबद्दल माहिती दिली. हो, त्याचा ( अर्जुन) साखरपुडा झाला आहे आणि त्याच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी आम्ही सगळेच आनंदी, उत्साहित आहो, असं सचिन म्हणाला.
View this post on Instagram
13 ऑगस्ट रोजी जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित असलेल्या एका खाजगी समारंभात अर्जुन आणि सानियाने एकमेकांना अंगठ्या घालत साखरपुडा केला. सानिया एका व्यावसायिक कुटुंबातून आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे.
