AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्विन, कुंबळे, हरभजन की कपिल देव, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर कोण?

आर अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत अष्टपैलू कामगिरी केली आहे.

अश्विन, कुंबळे, हरभजन की कपिल देव, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर कोण?
आर अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत अष्टपैलू कामगिरी केली आहे.
| Updated on: Feb 28, 2021 | 11:48 AM
Share

अहमदाबाद : टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने (Ravichandra Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. यासह अश्विन टीम इंडियाकडून 400 विकेट्स घेणारा चौथा भारतीय ठरला. तेव्हापासून टीम इंडियाचा मॅच विनर कोण आहे, हा सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे. यामुळे अनिल कुंबळे (Anil Kumble), कपिल देव (kapil Dev) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांचीही नावं पुन्हा चर्चेत आली आहेत. अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत घरच्या मैदानात शानदार शतकासह 8 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. यासह अश्विनने टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. अश्विन गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. निर्णायक क्षणी अश्विन फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. (who is biggest match winner of team india r ashwin anil kumble kapil dev harbhajan singh)

अश्विनने आतापर्यंत 77 कसोटींमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यापैकी 45 टेस्टमध्ये भारताचा विजय झाला आहे. तर कुंबळेने एकूण 132 सामने खेळले आहेत. यापैकी 43 सामन्यात भारताने विजय मिळवला होता. कपिल देव यांनी 131 टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. यापैकी 24 सामन्यात विरोधी संघाचा पराभव झाला. या तुलनेत अश्विनने कमी सामने खेळून दोघांपेक्षा अधिक सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे.

परदेशातील कामगिरी

अश्विनने भारताबाहेर खेळलेल्या एकूण सामन्यांपैकी 10 सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या जिंकलेल्या 10 कसोटींमध्ये त्याने 50 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. कपिल देव यांनी परदेशात फक्त 4 सामने जिंकले आहेत. तर कुंबळेने विदेशात झालेल्या 15 कसोटींमध्ये विजय मिळवला आहे. यामध्ये कुंबळेने 80 विकेट्स घेतल्या आहेत. यासह बोलिंगमध्ये अश्विनचा स्ट्राईक रेट हा या इतरांच्या तुलनेत चांगला आहे. अश्विन 53 चेंडूनंतर 1 विकेट घेतो. तर कुंबळेला 65.9, हरभजनला 64.80 तर कपिल देव यांना 63.9 चेंडूनंतर विकेट मिळायची.

प्रत्येक कसोटीत कुंबळे-हरभजनपेक्षा अधिक विकेट्स

अश्विन प्रत्येक कसोटीत सरासरीन 5 विकेट्स घेतो. याबाबतीतही अश्विन हरभजन आणि कुंबळेवर वरचढ ठरतो. अश्विन दर 25.27 धावा खर्चून 1 विकेट घेतो. तर कुंबळे 29.65 तर हरभजन 32.46 धावा प्रत्येक विकेटसाठी खर्च करायचे. अर्थात इतक्या धावानंतर त्यांना 1 विकेट मिळायची. टीम इंडियाकडून कसोटीत सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा विक्रम हा अनिल कुंबळेच्या नावे आहे. कुंबळेने एकूण 35 वेळा ही कामगिरी केली आहे. तर अश्विनने आतापर्यंत 29 वेळा ही 5 विकेट्स घेतल्या आहेत.

चौथा भारतीय

अश्विन टीम इंडियाकडून 400 बळींचा टप्पा ओलांडणारा चौथा गोलंदाज आहे. त्याने 401 विकेट्स घेतल्या आहेत. तर अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि हरभजन सिंह (417) विकेट्स घेतल्या आहेत.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | श्रेयसची शतकी खेळी, शार्दुलचा भेदक मारा, मुंबईचा राजस्थानवर 67 धावांनी विजय

कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी उरकला, शास्त्री सरांचा स्वत:च्या व्हायरल मीम्सवर भन्नाट रिप्लाय, म्हणाले..

(who is biggest match winner of team india r ashwin anil kumble kapil dev harbhajan singh)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.