IPL 2021 : चेन्नईच्या पराभवाचा व्हिलन कोण? धोनीच्या तोंडून, ‘कुछ तुम बोले, कुछ हम बोले…’!

Chennai Super Kings vs Mumbai Indian : कायरन पोलार्डने चेन्नईच्या बोलर्सला अक्षरश: तुडवलं. त्याच्या वादळात चेन्नईची टीम भुईसपाट झाली. मॅचच्या निर्णायक वळणावर कधीही कॅच न सोडणाऱ्या फॅफ डु प्लेसिसने पोलार्डचा सोपा कॅच सोडला आणि तिथेच सामना फिरला. याच गोष्टीची खंत धोनीने सामना संपल्यानंतर बोलून दाखवली.

IPL 2021 : चेन्नईच्या पराभवाचा व्हिलन कोण? धोनीच्या तोंडून, 'कुछ तुम बोले, कुछ हम बोले...'!
एम एस धोनी

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super kings) दिलेलं 218 धावांचं मोठं आव्हान मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पार करुन दाखवलं. शनिवारी दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्यात कायरन पोलार्डने (Kieron Pollard) चेन्नईच्या बोलर्सला अक्षरश: तुडवलं. त्याच्या वादळात चेन्नईची टीम भुईसपाट झाली. मॅचच्या निर्णायक वळणावर कधीही कॅच न सोडणाऱ्या फॅफ डु प्लेसिसने (Faf Du Plessis) पोलार्डचा सोपा कॅच सोडला आणि तिथेच सामना फिरला. याच गोष्टीची खंत कर्णधार धोनीने (MS Dhoni) सामना संपल्यानंतर बोलून दाखवली. मात्र त्याने फॅफचं नाव न घेता आमची फिल्डिंग खराब झाली. निर्णायक क्षणी आम्ही कॅच सोडले, एवढ बोलून त्याने ‘कुछ तुम बोले कुछ हम बोले…’ या गीताची आठवण करुन दिली. (Who is the villain of Chennai Super Kings defeat Against Mumbai Indians MS Dhoni Says Rued Dropped Catches Fielder)

फॅफने पोलार्डचा कॅच सोडला अन्…..

मुंबई संकटात सापडलेली असताना पोलार्ड मैदानात आला. आज तो ड्रेसिंग रुममधूनच सेट होऊन आला होता. तसंच 218 धावांचा पाठलाग करायचा तर पहिल्यापासूनच चेन्नईवर हुकूमत गाजवावी लागेल, हे त्याला कळलं होतं. त्याने पहिल्या बॉलपासून चेन्नईवर हल्ला चढवला. बघत बघता मैदानात पोलार्ड नावाचं वादळ आलं. त्याने केवळ 17 चेंडूत आपलं वादळी अर्धशतक पूर्ण केलं.

मुंबईला जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 31 रन्स हवे होते. त्यावेळी शार्दूलच्या बोलिंगवर पोलार्डने मोठा फटका मारला पण तो बॉल हवेत उंच उडाला. मात्र कधीही कॅच न सोडणाऱ्या फॅफने मोठी चूक केली त्याने पोलार्डचा कॅच सोडली आणि मॅचही सोडली. कॅच सुटल्यानंतर पोलार्डने मागे वळून बघितलं नाही. त्याने मुंबईला जिंकवूनच दिमाखात ड्रेसिंग रुममध्ये पाऊल ठेवलं.

धोनी काय म्हणाला?

“दिल्लीचं पीच खूप खास होतं म्हणजेच बॅटिंगसाठी अनुकुल होतं. बॅटवर चांगल्या प्रकारे बॉल येत होता. आमच्या बोलर्सला मार पडला हे खरंय. मात्र फिल्डिंगमध्ये आमच्याकडून नको त्या चूका झाल्या. शिवाय आम्ही महत्त्वाचे कॅच सोडले. (धोनीला फॅफ डुप्लेसीने सोडलेला पोलार्डच्या कॅचवर अधिक प्रकाश टाकायचा होता किंबहुना त्याच्या मनात तीच खंत होती).

पुढे बोलताना धोनी म्हणाला, “आमच्या प्लॅननुसार बोलर्सला कामगिरी करण्यात अपयश आलं. त्यांनी काही खराब चेंडू टाकले तर काही चांगल्या चेंडूंवरही त्यांना फटके पडले. गुणतालिकेत सगळ्यात अव्वल स्थानी असल्यानंतर अशा पराभवावेळी तुम्हाला अधिक दु:ख होत नाही..”

पोलार्डचं वेगवान अर्धशतक

पोलार्डने चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात 34 चेंडूत 6 फोर आणि 8 सिक्ससह 255.88 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 87 धावा चोपल्या. या दरम्यान पोलार्डने 17 चेंडूत अर्धशतक लगावलं. यासह पोलार्ड या 14 व्या मोसमात दिल्लीच्या पृथ्वी शॉला पछाडत कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. पृथ्वीने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

गगनचुंबी षटकार

पोलार्डने आपल्या खेळीत एकूण 8 सिक्स लगावले. त्यापैकी 3 सिक्स हे 90 मीटरपेक्षा अधिक लांबीचे लगावले. पोलार्डने 93, 97 आणि 105 मीटर लांबीचे गगनचुंबी सिक्स लगावले.

(Who is the villain of Chennai Super Kings defeat Against Mumbai Indians MS Dhoni Says Rued Dropped Catches Fielder)

हे ही वाचा :

IPL 2021 : रोहितच्या पलटणने आस्मान दाखवलं, मॅच चेन्नईच्या हातून कधी निसटली? धोनीने सांगितला नेमका ‘तो’ क्षण!

IPL 2021, MI vs CSK | वादळी खेळीसह पोलार्डचा विक्रम, मुंबईची ऐतिहासिक कामगिरी

MI vs CSK IPL 2021 Match 27 | कायरन पोलार्डची झंझावाती खेळी, रंगतदार सामन्यात मुंबईचा चेन्नईवर 4 विकेट्सने धमाकेदार विजय

Published On - 9:52 am, Sun, 2 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI