AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSL 2026 : ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पाने आयपीएल ऐवजी पाकिस्तानच्या पीएसएलची निवड का केली?

PSL 2026 : आयपीएलमध्ये भरपूर पैसा आहे. त्यामुळे देशोदेशीचे खेळाडू पाकिस्तानच्या पीएसएल ऐवजी आयपीएलला पसंती देतात. पण एक ऑस्ट्रेलियन खेळाडू अपवाद ठरला आहे. त्याने आयपीएल ऐवजी पीएसएलची निवड केली आहे.

PSL 2026 : ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पाने आयपीएल ऐवजी पाकिस्तानच्या पीएसएलची निवड का केली?
Adam Zampa
| Updated on: Apr 01, 2026 | 2:18 PM
Share

गद्दाफी स्टेडियमवर रविवारी पाकिस्तान सुपर लीगचा सामना झाला. या मॅचमध्ये कराची किंग्सने शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील लाहोर कलंदर्सवर विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झॅम्पाने महत्वाची भूमिका बजावली. झॅम्पाने चार ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन दोन विकेट काढल्या. यात त्याने एक निर्धाव षटक टाकलं. झॅम्पाला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. गुरुवारी रावळपिंडी विरूद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा एडम झॅम्पाची जादू दिसेल. या मॅचआधी एडम झॅम्पाला विचारण्यात आलं की, तू इंडियन प्रीमियर लीग ऐवजी पाकिस्तान सुपर लीगची निवड का केली?.

आयपीएल 2026 च्या लिलावासाठी ज्या 350 खेळाडूंची यादी काढण्यात आली होती. त्यात एडम झॅम्पाचा नाव नव्हतं. आयपीएल 2026 च्या ऑक्शनआधी सनराजयर्स हैदराबादने त्याला रिलीज केलं. त्यानंतर त्याने पाकिस्तानच्या पीएसएलची निवड केली. आयपीएलमध्ये याआधी तो रायजिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या टीम्सकडून खेळला आहे.

त्याला जास्त पैसा मिळण्याची शक्यता कमी आहे

“आयपीएलमध्ये माझा विचार होणार नव्हता. म्हणून मी या वर्षी आयपीएलमधून बाहेर पडलो. वाईट असलं तरी हे सत्य आहे की, माझ्याकडे जे कौशल्य आहे त्याला जास्त पैसा मिळण्याची शक्यता कमी आहे. अन्य कौशल्यांच्या बाबतीत असं मात्र नाहीय. आयपीएलसाठी जो वेळ द्यावा लागतो, त्याचा विचार करता खेळत राहणं हा माझ्यासाठी योग्य पर्याय आहे, असं मला वाटलं नाही” असं एडम झॅम्पा बोलला.

हे सर्व वेगात घडलं

“मी ब्रेक घ्यायचा प्लान केलेला. पण तेवढ्यात महिन्याभरापूर्वी पीएसएलचा प्रस्ताव आला. हे सर्व वेगात घडलं. पण आनंदी आहे” असं एडम झॅम्पाने सांगितलं. एडम झॅम्पा आयपीएलमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळला असून त्याने 31 विकेट काढल्या आहेत.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग