MS Dhoni | यंदा साखळी फेरीतच गारद, पुढील IPL मध्ये धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार? CEO म्हणाले…

धोनी आयपीएलच्या 13 व्या मोसमानंतर निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे.

MS Dhoni | यंदा साखळी फेरीतच गारद, पुढील IPL मध्ये धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार? CEO म्हणाले...
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 4:06 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात चेन्नई सुपर किंग्जसला (Chennai Super Kings) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नई आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये पोहचली नाही. चेन्नईची या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि इतर खेळाडूंनाही या मोसमात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चेन्नईच्या समर्थकांमध्येही निराशेचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान या मोसमानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा पाहायला मिळतेय. धोनी चेन्नईचे नेतृत्व करणार की नाही, याबाबत चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Will Mahendra Singh Dhoni Play The Role Of Csk Captain In The 14th Season Of IPL The CEO said

सीईओ काय म्हणाले?

“धोनी आयपीएलच्या 14 व्या मोसमात म्हणजेच 2021 मध्ये चेन्नईचे निश्चितच नेतृत्व करेल. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नईला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. आम्ही या वर्षीच प्ले ऑफमध्ये पोहचलो नाही. एक वर्ष निराशाजनक कामगिरी राहिली, म्हणजे सर्वच संपलं असं होत नाही”, असं सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले.

“यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीआधीच ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना आणि हरभजन सिंह या दोघांनी माघार घेतली. तसेच चेन्नईच्या काही खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली. यासर्व प्रकारामुळे चेन्नईचे संतुलन बिघडले, असंही विश्वनाथन यांनी नमूद केलं. “या मोसमात आम्हाला आमच्या लौकीकानुसार कामगिरी करता आली नाही. आम्ही जिंकण्याचे सामनेही गमावले. त्यामुळे आम्ही मागे राहिलो”, अशी खंत ही विश्वनाथन यांनी व्यक्त केली.

धोनीची आयपीएल कारकिर्द

धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 202 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 136.89 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 631 धावा केल्या आहेत. यामध्ये 23 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीची 84 नाबाद ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीला या 13 व्या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नाही. धोनीने या मोसमात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले. यामध्ये 118.45 च्या स्ट्राईक रेटने 199 धावा केल्या आहेत. धोनीला या 12 सामन्यात एकही अर्धशतक लगावता आले नाही. धोनीची या मोसमातील 47 नाबाद ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच 8 व्या क्रमांकावर आहे. चेन्नईने या मोसमात एकूण 12 सामने खेळले आहेत. यापैकी केवळ 4 सामन्यातच चेन्नईचा विजय झाला आहे. तर 8 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान चेन्नई या मोसमातील आगामी सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | चेन्नई सुपर किंग्जसचे आव्हान संपुष्टात, साक्षी धोनीची भावूक पोस्ट

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

Will Mahendra Singh Dhoni Play The Role Of Csk Captain In The 14th Season Of IPL The CEO said

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.