AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Open | नोवाक जोकोविचची ‘यूएस ओपन’मधून हकालपट्टी, लाईन जजच्या घशावर चेंडू मारल्याने कारवाई

पहिल्या सेटमध्ये चौथ्या फेरीत प्रतिस्पर्धी पाब्लो कॅरेनो बुस्टाने पिछाडीवर टाकले, तेव्हा रागाच्या भरात जोकोविचने मारलेला चेंडू लाईन जजच्या घशावर लागला.

US Open | नोवाक जोकोविचची 'यूएस ओपन'मधून हकालपट्टी, लाईन जजच्या घशावर चेंडू मारल्याने कारवाई
| Updated on: Sep 07, 2020 | 8:12 AM
Share

न्यूयॉर्क : यूएस ओपनमध्ये आपले 18 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्यास उत्सुक असणारा टेनिसस्टार नोवाक जोकोविचला धक्का बसला आहे. अत्यंत खळबळजनक पद्धतीने ‘डीफॉल्ट’ ठरल्याने जोकोविचला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. लाईन जजच्या घशावर चेंडू मारल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे जोकोविचच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. (World No 1 Tennis Star Novak Djokovic has been DEFAULTED from the US Open)

पहिल्या सेटमध्ये चौथ्या फेरीत प्रतिस्पर्धी पाब्लो कॅरेनो बुस्टा याने जोकोविचला 6-5 ने पिछाडीवर टाकले, तेव्हा रागाच्या भरात (अनवधानाने) त्याने मारलेला चेंडू लाईन जजच्या घशावर लागला. त्यानंतर झालेल्या कारवाईमुळे जगातील अव्वल मानांकित सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविचला स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढवली.

कोणत्या नियमाचे उल्लंघन?

ग्रँडस्लॅमच्या अधिकृत नियम पुस्तिकेतील तिसऱ्या अनुच्छेदात असलेल्या कलम ‘एन’चे जोकोविचने उल्लंघन केले, ते म्हणजे प्लेअर ऑन-साइट नियमभंग. त्यानुसार “बॉल अ‍ॅब्युज” म्हणजे “खेळाडूने सामन्यादरम्यान पॉइंट मिळवण्याचा उद्देश वगळता हिंसकपणे, धोकादायकपणे किंवा रागाने स्पर्धेच्या आवारात टेनिस बॉल मारणे, फेकणे अथवा किक मारणे नियमबाह्य आहे”

पहा व्हिडीओ :

चेअर अंपायर (पंच) ऑरेली टूर्ट यांनी यूएस ओपन स्पर्धेचे रेफरी सोरेन फ्रेमेल आणि मुख्य ग्रँड स्लॅम सुपरवायझर आंद्रेस एगली यांना बोलावले. त्यांनी एकमेकांशी सल्लामसलत केली आणि संबंधित सर्व तथ्य एकत्रित पडताळून हा निर्णय घेतला. सुदैवाने लाईन जजची प्रकृती ठीक आहे.

हेही वाचा : भारताची सात वर्षांची प्रतीक्षा संपली, यूएस ओपनमध्ये सुमित नागलचा ऐतिहासिक विजय

परिणामी, यूएस ओपनमध्ये मिळवलेले रँकिंग पॉईंट जोकोविचला गमवावे लागतील. दंडाच्या रकमेसह पारितोषिकात मिळालेली रक्कमही त्याला सोडावी लागेल. (World No 1 Tennis Star Novak Djokovic has been DEFAULTED from the US Open)

जोकोविचने घडलेल्या प्रकारानंतर दिलगिरी व्यक्त केली. “संबंधित लाईन जजची आपण विचारपूस केली, तिला झालेल्या नाहक त्रासाबद्दल मी दिलगीर आहे. हा धडा मी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सत्कारणी लावेन. यूएस ओपन आयोजकांची क्षमा मागतो. धन्यवाद आणि क्षमस्व”

(World No 1 Tennis Star Novak Djokovic has been DEFAULTED from the US Open)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.