WTC Final : 86 दिवसानंतर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा संघ असा असेल, या अष्टपैलू खेळाडूचं होणार कमबॅक!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची आतापासून मोर्चेबांधणी सुरु आहे. बीसीसीआय खेळाडूंची निवड करताना कोणतीही चूक करू इच्छित नाही.

WTC Final : 86 दिवसानंतर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा संघ असा असेल, या अष्टपैलू खेळाडूचं होणार कमबॅक!
WTC Final : 86 दिवसानंतर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा संघ असा असेल, या अष्टपैलू खेळाडूचं होणार कमबॅक!Image Credit source: ICC
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 2:43 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतानं दुसऱ्यांदा धडक मारली आहे. न्यूझीलँडने श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला आणि भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना रंगणार आहे. भारताच्या आतापर्यंतच्या सर्व कसोटी मालिका संपलेल्या आहेत. त्यामुळे भारत थेट अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या वातावरणात कोणता खेळाडू तग धरून खेळेल याची चाचपणी आतापासून केली जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनुभवी आणि इंग्लंडमध्ये तग धरणाऱ्या खेळाडूंचा विचार केला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत या मालिकेतील खेळणाऱ्या काही खेळाडूंना डच्चू मिळेल. तर काही खेळाडूंना या संघात स्थान मिळू शकते.

केएल राहुल आणि केएस भारतला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळणं कठीण आहे. कारण दोघांनाही फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नाही. केएल राहुलला तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. ऋषभ पंतला जबर दुखापत झाल्याने तो काही 86 दिवसात फीट होईल असं चित्र नाही.

श्रेय्यस अय्यरही पाठीच्या दुखापतीमुळे जायबंदी झाला आहे. त्यामुळे काही खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच शुभमन गिलचा फॉर्म पाहता त्याला संघात स्थान मिळेल. तसेच अजिंक्य रहाणे श्रेयस अय्यरच्या जागी पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांचा देखील विचार केला जाऊ शकतो.

दुसरीकडे, जसप्रीत बुमराह कमबॅक करेल अशी तीळमात्र शक्यता नाही. त्यामुळे हा पर्याय देखील उरणार नाही. त्यामुळे उमेश यादवचं संघातील स्थान निश्चित आहे, असंच म्हणावं लागेल. त्यात बीसीसीआयने अष्टपैलू हार्दिक पांड्याशी कसोटीत खेळण्याबाबत चर्चा सुरु केली आहे.

त्यात वेगवान गोलंदाजीचं वर्चस्व इंग्लंडमध्ये असल्या कारणाने हर्षल पटेल आणि दीपक चाहर याचा विचार केला जाऊ शकतो. दोघंही गोलंदाजीसोबत चांगली फलंदाजी करतात. बीसीसीआय यावेळी खेळाडू निवडताना काळजी घेत आहे. त्यासाठी आतापासूनच चाचपणी सुरु आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अशी असू शकते टीम इंडिया

संभावित टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ईशान किशन/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, दीपक चाहर/सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानात असणार आहे. सामन्यात कोणत्याही कारणास्तव व्यत्यय आल्यास आयसीसीने एक दिवस राखून ठेवला आहे. म्हणजेच 12 जून हा दिवस राखीव असेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.